*⚡कणकवली ता.२४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल विभागामार्फत ई-पीक पाहणी संदर्भात मोठी जनजागृती करण्यात येत आहे. त्याच उपक्रमाअंतर्गत कणकवली तालुक्यातील कलमठ बिडयेवाडी येथे तलाठी सौ.सुवर्णा कडुलकर यांच्या उपस्थितीत नागरिकांना जनजागृती करण्यात आली.यावेळी २०-२५ शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अँपद्वारे आपल्या पिकांच्या व अन्य नोंदी केल्या आहेत.त्यामुळे वर्षोनुवर्षे राखलेल्या पिकांची नोंद होण्यास मदत होणार असल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले. कलमठ बिडयेवाडी येथील गणेश मंदिर येथे ई-पीक पाहणी नोंदणी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.यावेळी कलमठ सरपंच सौ.धनश्री मेस्त्री,सामाजिक कार्यकर्ते उदय नाडकर्णी,अनुप वारंग,ग्रामपंचायत सदस्य गणेश पुजारे, संजय गुरव, महिंद्र पुजारे,पपु यादव, नागेश मेस्त्री संजय पुजारे, सुर्यकांत लाड, अक्षता लाड, अंकिता लाड,संतोष मेस्त्री,सुहासिनी मेस्त्री व बिडयेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
कलमठ बिडयेवाडी येथे ई-पीक पाहणी नोंदणी बद्दल तलाठ्यांचे मार्गदर्शन
