*⚡कणकवली ता.२४-:* शिडवणे येथे शासनाच्या ऑनलाइन ई पीक पाणी पेरा नोंदणी कार्यशाळा कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्यक्ष भातशेतीच्या क्षेत्रावर जाऊन घेण्यात आली. व शेतकऱ्यांच्या पीक पाण्याची ऑनलाइन नोंद शेतकऱ्यांकडूनच करवून घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद माजी बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार,खारेपाटण – तळेरे मंडळ अधिकारी संतोष नागवकर,तांत्रिक सह्ययक बाजीराव काशीद,शिडवणे ग्रा पं सदस्य प्रकाश पाटणकर तसेच शेतकरी बांधव या कार्यशाळेला उपस्थित होते. कणकवली तससीलदार आर. जे. पवार यांनी शिडवणे येथील शेतकरी बांधवांना शासनाच्या ई पीक पाणी योजने विषयी माहिती दिली. व आपल्या पीक पाण्याची नोंद आपण स्वतः करून शासनाच्या योजनांचा पुरेपूर लाभ घ्या असे आवाहन यावेळी तहसीलदार आर. जे. पवार यांनी शेतकरी बांधवांना केले. यावेळी खारेपाटण विभागातील सर्वच शेतकऱ्यांच्या ई पीक पाणी नोंदी शासनाच्या मार्गदर्शनाखाली करून घेतल्या जातील.असे माजी जि प बांधकाम सभापती रवींद्र जठार यांनी सांगितले.
शिडवणे येथे ई पीक पाणी पेराची प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन केली नोंदणी
