Global Maharashtra Breaking News

राज्य मंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थित कोकीसरे गावातील कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश

*⚡वैभववाडी ता.३०-:* कोकिसरे येथील अनेक कार्यकर्त्यानी राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत ओरोस सिंधुदुर्ग येथे नुकतेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.राजमंत्री सतीश उर्फ बंटी पाटील नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे गावातील अनेक कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेला भविष्यात काँग्रेस पक्ष न्याय देऊ शकतो या भावनेने काँगेस पक्षात प्रवेश केला आहे….

Read More

बी एस एन एल च्या गलथान कारभारामुळे बी एस एन एल केबलच्या चेंबरला भगदाड

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; अधिकाऱ्यांना धरले धारेवर *⚡सावंतवाडी ता.३०-:* शहरातील माठेवाडा भागीरथी व आत्मेश्वर मंदीर रोडवरील बीएएसएन केबलच्या चेंबरला मोठी भगदाड पडली असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टींंन आक्रमक पवित्रा घेत बीएएसएनएलचे मुख्य प्रबंधक श्री. देशमुख यांना फोनद्वारे संपर्क साधून परिस्थितीची गंभीरता लक्षात आणून दिली. त्यानंतर देशमुख यांनी तात्काळ सबडिव्हीजन इंजिनिअर आशिष…

Read More

देवगड-विजयदुर्ग नळयोजना अनुदानाचा प्रस्ताव फेटाळला

सिंधुदुर्गनगरी ता ३० देवगड व विजयदुर्ग प्रादेशिक नळ पाणी योजनेवर गेल्या पंचवीस वर्षात ४० ते ५० कोटी रुपये निधी देखभाल दुरुस्तीवर खर्च करण्यात आला आहे. या दोन योजना चालवण्यासाठी होत असलेला भरमसाठ खर्च आणि अन्य तालुक्यांवर होत असलेला अन्याय पाहता सन २०२१- २२ च्या सुधारित अंदाजपत्रकातून पुनर्विलोकनाने देवगड व विजयदुर्ग नळ योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी १४…

Read More

फ्लाय ओव्हर ब्रिजखाली भाजी-फळ विक्रेते बैठक व्यवस्थेचे नियोजन योग्यच

राष्ट्रवादी नगरसेवक अबिद नाईक यांची भूमिका *⚡कणकवली ता.३०-:* कणकवली शहरातील भाजी, फळ, फुले विक्रेत्यांना नगरपंचायतीने फ्लाय ओव्हर ब्रिज खाली आखुन दिलेली जागा ही शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने योग्य आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने केलेले हे नियोजन कणकवली शहराच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने योग्य असतानाच, अस्ताव्यस्त बसलेल्या भाजी – फळ – फुले विक्रेत्यामुळे शहराला निर्माण झालेला बकालपणा या माध्यमातून दूर…

Read More

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी घेतली सदिच्छा भेट

सावंतवाडी : कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सावंतवाडी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील बुथ कमिटीचा परफॉर्मन्स चांगला आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपरिषद आदी निवडणुकीत सावंतवाडी तालुका कॉंग्रेस कमिटीला पक्ष पुर्ण ताकद देणार, महाराष्ट्र कॉंग्रेस तुमच्या सोबत आहे असा शब्द…

Read More

रस्त्यांची कामे आम्हीच करणार ..विरोधी नगरसेवकांनी काळजी करू नये

सत्ताधारी गटनेते संजय कामतेकर यांचा विरोधकांना टोला *⚡कणकवली ता.३०-:* पावसाळ्याच्या कालावधीत रस्त्यांची कामे होत नाहीत. असे असतानाही नगरसेवक सुशांत नाईक यांनी मागणी केलेली रस्त्याची दोन कामे ही सुशांत नाईक यांच्या होत असलेल्या कॉम्प्लेक्ससाठी त्यांना पाहिजे आहेत. पावसाळा संपल्यानंतर शहरातील रस्त्यांची कामे सत्ताधारी म्हणून आम्हीच करणार. त्याची विरोधी नगरसेवकांनी काळजी करू नये. असा टोला सत्ताधारी गटनेते…

Read More

वीज बीलावरील पठाणी व्याज कमी करा

भाजपचे आचरा विद्यूत मंडळ कार्यालयावर धडक *⚡मालवण ता.३०-:* कोरोना काळात व्यवसाय ठप्प झाल्याने थकीत वीज बिलावरील पठाणी व्याज दर कमी करा,वीज बीले टप्प्याटप्प्याने भरुन घ्या,वीज ग्राहकांना त्रास दिल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा देत आचरा विभागिय भाजपा कार्यकर्त्यांनी बुधवारी आचरा विद्यूत मंडळ कार्यालयावर धडक देत मागण्यांची पंधरा दिवसांत पुर्तता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप मालवण…

Read More

सोनाली कोदे-तळाशीलकर यांच्या प्रयत्नातून हडी शेलटीवाडीत निवाराशेड

ग्रामस्थातुन समाधान मालवण (प्रतिनिधी) मालवण पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या सौ. सोनाली कोदे-तळाशिलकर यांच्या माध्यमातून हडी शेलटीवाडी येथे प्रवाशांसाठी मंजूर झालेल्या निवारा शेडचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थ व प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. शेलटीवाडी येथे निवारा शेड मंजूर होण्यासाठी हडीचे माजी सरपंच सुशील शेडगे यांनी सोनाली कोदे यांच्याकडे मागणी केली…

Read More

सातार्डा येथे बेकायदा दारु वाहतूकप्रकरणी कारवाई

कुडाळ-माणगावच्या तरुणाला अटक : ७ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त *⚡बांदा ता.३०-:* गोव्यातून सातार्डामार्गे जिल्ह्यात होणार्‍या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने आज कारवाई केली आहे. यात रॉयल ब्रँड व्हिस्कीच्या ७५ बॉक्समधून एकूण ३६०० बाटल्या जप्त करण्यात आल्या. दारु व दारु वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट कार (एमएच ०२ एलडी ६६५१) असा एकूण…

Read More

राजन करकरे या जेष्ठाच्या मदतीला धावले नगरसेवक सुदेश आचरेकर

रुग्णालयात केले दाखल;आर्थिक मदत दिली मिळवून *मालवण दि प्रतिनिधी* मालवण बाजारपेठ येथे बेवारस स्थितीत उपचारासाठी असलेल्या ज्येष्ठ व्यक्ती राजन करकरे याला स्थानिक नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी स्वखर्चातून ग्रामीण रुग्णालय याठिकाणी दाखल केले आहे. राजन करकरे पायाच्या व्याधीने त्रस्त असल्याने त्यांना यापूर्वी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते मात्र काही दिवसातच ते तेथून…

Read More
You cannot copy content of this page