संजू परब आ नितेश राणे याचा राजीनामा मागण्याचे धाडस करतील का ?

आ दीपक केसरकर कट्टर समर्थक संजय नाईक यांचा प्रश्न

*⚡दोडामार्ग दि. २०-:* दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत अपयश आले म्हणून जर संजू परब आमचे आमदार दीपक केसरकर यांचा राजीनामा मागत असतील तर शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांनी देवगड मध्ये भाजप व तेथील आमदार नीतेश राणे यांनी पाणी पाजले, त्यामुळे आमदार नितेश राणे यांचा राजीनामा मागण्याच धाडस संजू परब दाखवतील का असा खडा सवाल आमदार दीपक केसरकर यांचे दोडामार्ग मधील कट्टर समर्थक संजय नाईक यांनी उपस्थित केला आहे.

राजकारण म्हटले की त्यात जय, पराजय,यश अपयश आलेच पण जनतेतून निवडून गेलेल्या आमदार दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याची संजू परब परब यांनी केलेली मागणी रास्त नाही. शिवाय आम्ही जरी संजू परब यांना नीतेश राणे यांच्या राजीनाम्याची मागणी करतील का असा सवाल उपस्थित करत असलो तरी तशी आमचीही इछा नाही. परंतु ज्या पद्धतीने संजू परब यांनी खालच्या पातळीवर आमदार दीपक केसरकर यांच्यावर केलेली टीका आम्ही मुळीच खपवून घेणार नाही असा इशारा आमदार केसरकर प्रेमी व शिवसेना कार्यकर्ते संजय नाईक यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page