दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे यांची प्रतिक्रिया
*⚡दोडामार्ग ता.२० सुमीत दळवी-:* दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून, 8 ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने चांगली लढत दिली. त्यातील एका जागेवर विजय झाला तर दोन जागा केवळ एका मताच्या फरकाने हातून गेल्या तर एका जागेवर चिठ्ठी ने विरोधकांना साथ दिली तर अन्य 4 जागांवर उमेदवारांनी चांगली लढत दिली. त्यामुळे हे अपयश नसून, यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीची ताकद सर्वांना दाखवून देऊ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला आहे.
