मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांचा उपविभागीय अधिकारी यांना इशारा
*⚡कणकवली ता.२०-:* शासन व प्रशासन तसेच 100 ते 150 कोटीची राष्ट्रीय संपत्ती सिलिका वाळूची लूट करणाऱ्या वाळू माफियांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 6 जानेवारी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाप्रमाणे 26 जानेवारी दिवशी काळ्या फिती लावून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिला आहे.
मनसे कणकवली तालुक्याच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्याचे पक्षाच्या बैठकीत ठरविले असून सदर आंदोलन हे कोविड नियमांचे पालन करून शासन व प्रशासन तसेच 100 ते 150 कोटीची राष्ट्रीय संपत्ती सिलिका वाळूची लूट करणाऱ्या वाळू माफियांविरोधात करणार आहोत.या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था बाबतची कोणतीही परिस्थिती निर्माण झाल्यास याबाबतची पूर्ण जबाबदारी आपल्या कार्यालयाची असेल असेही नमूद करण्यात आले आहे. 24 नोव्हेंबर रोजी केलेल्या आंदोलनानंतर दिनांक 24 डिसेंबर रोजी माजी आम. परशुराम उपरकर यांनी केलेल्या चर्चेच्या मागणीनुसार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.
चर्चेतील मुद्द्यानुसार आपण केलेल्या सूचनांनुसार प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसून उलट या वाळू माफियांना कागदोपत्री पाठीशी घालण्याचे काम तलाठ्यापासून वरिष्ठ अधिकारी या सर्वांनी केलेले निदर्शनास आलेले आहे. झालेल्या चर्चेत आपण दिलेल्या सूचनांचे पालन केले गेलेले दिसले नाही या विरोधात 6 जानेवारीला 26 जानेवारी 22 रोजी काळी फीत लावून ठिय्या आंदोलन करण्याचे निवेदन दिले होते. सदर निवेदनात नमूद केले होते सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत 15 जानेवारीपूर्वी बैठक लावून कारवाईचा आढावा घेण्याबाबत सुचविले होते मात्र आपणाकडून संबंधित अधिकार्यांसमवेत एकत्र बैठक घेतलेली नाही तसे पत्रही दिलेले नाही चालू असलेल्या कारवाईतल्या महसूल कायद्या अंतर्गत त्रुटी आपणास आम्हाला दाखविता आलेल्या नाहीत. म्हणूनच हे ठिय्या आंदोलन असल्याचे दया मेस्त्री यांनी म्हटले आहे. यावेळी मनसे कणकवली तालुका अध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर,दत्ताराम अमृते, निलेश मेस्त्री, निल आचरेकर, सर्वेश परब व अन्य उपस्थित होते.
