*⚡कणकवली ता.२०-:* देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणूकित मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,राष्ट्रीय काँग्रेस( महाविकास आघाडीचे ) गटनेते संतोष तारी यांनी आमदार वैभव नाईक यांची कणकवली विजयभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी आ.वैभव नाईक यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्याचप्रमाणे भविष्यात देवगडची विकासात्मक वाटचाल कशी असावी यावरही चर्चा करण्यात आली.
