ओबीसी समाजास राजकारणातून हद्दपार करण्याचा ठाकरे सरकारचा डाव:राजन तेली
कणकवली ता.०४-:* राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याचा कुटिल डाव अमलात आणण्यासाठी ठाकरे सरकारने जाणीवपूर्वक न्यायालयासमोर त्रुटी असलेला तपशील सादर केला, असा थेट आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शुक्रवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने, ठाकरे सरकारचा ओबीसी समाजाविरुद्धचा आकस स्पष्ट झाला असून पुढील…
