‘स्वर सुमानांजली’द्वारे ८ मार्चला तीन रत्नाना वाहणार श्रद्धांजली

केशवसुत कट्टा येथे होणार कार्यक्रम

सावंतवाडी ता.०४-: कै.गुरुवर्य रघुनाथ उर्फ बाबी मेस्त्री व स्व. प्रा. मिलिंद दत्ताजीराव भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ,सावंतवाडी यांच्या तर्फे “भारतरत्न लता मंगेशकर”, “पं रामदास कामत” व “स्वरसम्राज्ञी कीर्ती शिलेदार” यांना सांगीतिक आदरांजली म्हणून ‘स्वर सुमनांजली’ या मैफिलीचे आयोजन मंगळवार दि. ८ मार्च रोजी सायंकाळी ठिक ५:३० वा. “केशवसुत कट्टा, मोती तलाव, सावंतवाडी” येथे करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम सद्गुरु संगीत विद्यालयाचे यशस्वी व नामांकित विद्यार्थी सादर करणार आहेत तरी, या कार्यक्रमास सर्व रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष व विद्यालयाचे संचालक श्री निलेश मेस्त्री व पालकवर्गाकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page