शिवसेना पुरस्कृत पॅनेलचा दारुण पराभव, सर्वच्या सर्व जागा जिंकत भाजप पॅनेलने सत्ता केली काबीज
मालवण ता.०४-:* श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या, आचरा या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप प्रणित सहकार पॅनेलने शिवसेना पुरस्कृत पॅनेलचा दारुण पराभव करीत सर्वच्या सर्व म्हणजे १३ ही जागांवर विजय संपादन करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले
दरम्यान, १३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत १२ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले मात्र सेनेचा एक उमेदवार एका मताने विजयी झाला होता. मात्र भाजप पुरस्कृत उमेदवाराने फेरमोजणीची मागणी केल्यानंतर दोनदा झालेल्या फेरमोजणीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्याने तीही जागा सेनेकडून हिसकावून घेत भाजपने शिवसेनेला अस्मान दाखविले श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या, आचरा या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुक पार पडली या निवडणुकीत भाजप प्रणित सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले.
यामध्ये भाजप पुरस्कृत सौ प्रिया वामन आचरेकर ३२६ मते , समिर बांवकर ३२१ मते, प्रफुल्ल घाडी ३३८ मते , अवधूत हळदणकर ३४० मते ,लवू मालंडकर ३३७ मते संतोष मिराशी ३२७ मते , प्रशांत पांगे ३२९ मते धनंजय टेमकर ३६७ मते, लक्ष्मण आचरेकर ३४९ मते , डॉ प्रमोद कोळंबकर ३७७ मते निशा गावकर ३४२ मते मनाली तोंडवळकर ३०४ मतांनी विजयी झाले. तर शिवसेना पुरस्क्रूत विनायक परब २९१ यांनी भाजप पुरस्कृत भिकाजी कदम २९० मते यांचा एका मताने पराभव करत निवडून आल्याचे जाहीर झाल्यावर त्यावर भाजप पदाधिकाऱ्यानी आक्षेप घेत फेर मोजणीची मागणी केली. यात विनायक परब यांचे एक मत कमी होते त्यांना २९० मते मिळाली तर भिकाजी कदम यांना दोन मते वाढून २९२ मते मिळवून निवडून आले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकृष्ण मयेकर यांनी काम पाहिले. या निवडीनंतर भाजप तर्फे आचरा तिठा येथे जल्लोष करण्यात आला. या विजयानंतर बोलताना तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी हा विजय सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परीश्रमाचा असून कार्यकर्त्यांनी या विजयाचा उन्माद डोक्यात न घेता भविष्यातील येवू घातलेल्या निवडणूका जिंकण्या साठी सर्वांनी असेच प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जेराँन फर्नांडिस, निलिमा सावंत,महेश हडकर,आचरा सरपंच प्रणया टेमकर, संतोष गांवकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे,जयप्रकाश परुळेकर,देवेंद्र हडकर,उदय घाडी,विजय कदम, यांसह बहूसंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
