शिक्षक समितीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल जाहीर

टॉप टेनमध्ये सोहम कोरगांवकर, यशश्री ताम्हणकर यांचा समावेश

सिंधुदुर्गनगरी ता ०४-:* महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग आयोजित इ ५ वी जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागला असून जिल्हास्तरीय टाॅप १० गुणवत्ता यादीमध्ये सावंतवाडी चराठे नं १ शाळेचा कु सोहम बापूशेठ कोरगावकर प्रथम (गुण २६६) आला असून मालवणची मसुरे नं १ ची कु यशश्री गुरूनाथ ताम्हणकर(गुण २६०)दुसरी आली असून देवगडचा पुरळ हुर्शीचा कु संस्कार संभाजी झांबरे गुण (२५४)व सावंतवाडी सांगेली सावरवाडचा कु पारस देवदास दळवी (गुण २५४) दोघेही तिसरे आले आहेत.

तसेच जिल्हास्तरीय टाॅप १० गुणवत्ता यादीत सावंतवाडीचे ७,मालवणचे ४,कुडाळ देवगड वेंगुर्ला दोडामार्ग या तालुक्यांचे प्रत्तेकी एक विद्यार्थी चमकला आहे.

शिक्षक समिती सिंधुदुर्ग च्या जिल्हास्तरीय इ ५ वी शिष्यवृत्ती सराव परीक्षेला एकूण २०७० विद्यार्थी बसलेले होते यामधून जिल्हास्तरीय टाॅप १० गुणवत्ता यादी तयार करण्यात आली असून – कु शादुल गोठोसकर कांदुळी कुडाळ (गुण २५०)व कु जान्हवी पाटील कुंभवडे दोडामार्ग (गुण २५०) दोघेही चौथ्या क्रमांकावर, कु कोमल राणे कांदळगाव मालवण (गुण २४८) व कु मुक्ता काळसेकर नांदरूख आमडोस मालवण( गुण २४८) दोघेही पाचव्या क्रमांकावर, कु अक्षरा राऊळ शिरशिंगे सावंतवाडी गुण (२४४) व कु किमया परब बांदा नं १ सावंतवाडी (गुण २४४) दोघेही सहाव्या क्रमांकावर, कु कनिष्का राजन तेली बांदा नं १ सावंतवाडी गुण २३८ सातव्या क्रमांकावर, कु शंभू पांढरे निरवडे कोणापाल सावंतवाडी( गुण २३६)आठव्या क्रमांकावर, कु हर्षाली सुरवसे मठ नं १ मालवण (गुण २३४) नवव्या क्रमांकावर तर कु अथर्व मौर्ये सोनुली सावंतवाडी (गुण २३२)व कु लावण्या राणे वजराठ नं १ वेंगुर्ला (गुण २३२) आदी विद्यार्थ्यांचा समावेश झाला आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षक समिती जिल्हाशाखा सिंधुदुर्ग च्यावतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. लवकरच या टाॅप १० गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांंचे गुणगौरव कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम व जिल्हासरचिटणीस सचिन मदने यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page