कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
कणकवली ता.०४-:* घोणसरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या भारतीय जनता पार्टी पुरस्कृत श्री सिद्धिविनायक सहकार विकास पॅनलच्या प्रचारार्थ नवनिर्वाचित सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा पार पडली.
या सभेत सोसायटी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का बसला आहे. यावेळी आमदार नितेश राणे आणि सभापती मनोज रावराणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत घोणसरी गांगोलिंग देवस्थानचे प्रमुख मानकरी संतोष (बाबू) रावराणे, प्रकाश (बाबू) घाडी यांसह विरोधी शिवसेना पॅनल मधून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपा प्रणित पॅनलच्या उमेदवार अपर्णा तापेकर, प्रकाश तापेकर,प्रताप तापेकर, बाबा येंडे,कृष्णा शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गावातील प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश केला.
त्यामुळे यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, उपसभापती मिलिंद मेस्त्री,जिल्हा बँक संचालक समीर सावंत, प्रज्ञा ढवण, माजी उपसभापती तुळशीदास रावराणे,माजी उपसभापती प्रकाश पारकर,पॅनल प्रमुख मॅक्सी पिंटो,सरपंच मृणाल पारकर,उपसरपंच विलास मराठे,दूध सोसायटी चेअरमन गणेश परब,सहकारी सोसायटी व्हाइस चेअरमन विठ्ठल बागवे,गावातील ज्येष्ठ दाजी गायकवाड त्याचप्रमाणे उमेदवार समीर राणे, छोटू पारकर,रवींद्र सावंत,दत्ताराम गुरव,सुभाष मराठे,प्रकाश हजारे,बबन साळसकर,विजय एकावडे,सीताराम तांबे,अपर्णा तापेकर,रंजना राणे उपस्थित होते.या सभेचे सूत्रसंचालन मिलिंद मराठे प्रास्ताविक मॅक्सी पिंटो तर आभार छोटू पारकर यांनी मानले.
