बाल कलाकारांच्या नृत्यविष्कारांनी रसिकांची जिंकली मने

ट्विकल स्टार प्ले स्कूल कणकवलीचे स्नेहसंमेलन उत्साहात

कणकवली ता.०४-:* कणकवली शिवाजी नगर येथील ट्विकल स्टार प्ले स्कूलच्या स्नेहसंमेलनात बाल कलाकारांनी आपले कलाविष्कार सादर करून उपस्थितांनी मने जिंकली. ट्विकल स्टार प्ले स्कूलमध्ये स्नेहसंमेलन पार पडले. या स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यानिमित्त डान्स स्पर्धाही घेण्यात आली.

या स्पर्धेत 15 स्पर्धांनी सहभाग घेत विविध गाण्यांवर नृत्यविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत अधिरा मल्हार हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय स्वरा कोकरे तर निशांक शिंगाडे याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. डान्स स्पर्धेचे निवेदन तन्वी भावे यांनी केले. या स्नेहसंमेलनाचा शुभारंभ युवा सनेचे उपशरप्रमुख सोहम वाळके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकार लक्ष्मीकांत भावे,संजय पेटकर, सुनील आजगांवकर, नीलेश वाळके,नाना डंबे,विजय राणे,तन्वी भावे,शिक्षिका अंजली आजगावकर,विशाखा ठाकूर,विद्यार्थी पालक उपस्थित होते.

त्यांचे ट्विकल स्टार प्ले स्कूलच्यावतीने स्वागत करण्यात आले. कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंद होत्या. परिणामी विद्यार्थ्यांना घरी रहावे लागले होते. आता कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्यात आले. असून प्ले स्कूलही पुन्हा सुरू झाले आहेत. या प्ले स्कूलमधील मुलांच्या अंगीभूत असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.या कर्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्कुलच्या संचालिका श्रीमती सुनीता कदम यांनी केले.

You cannot copy content of this page