Headlines

Global Maharashtra Breaking News

अवैधरित्या चार बोलेरो खरेदी प्रकरणी १३ ही संशयितांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता…

ओरोस ता.१९-:* २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारासाठी अवैधरित्या १३ चार चाकी बोलेरो वाहने खरेदी केल्याप्रकरणी काँग्रेसच्या तत्कालीन एकूण १३ पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच वाहने जप्त करण्यात आली होती. हे प्रकरण त्यावेळी गाजले होते. दरम्यान, याचा निकाल मुख्य न्याय दंडाधिकारी ए एम फडतरे यांच्या…

Read More

कोचरा खाडीपात्रात बुडून ८ वर्षीय बालकाचा मृत्यू…

वेंगुर्ले ता १९-:* कोचरा खाडीपात्रामध्ये आंघोळीला गेलेल्या मुंबई येथील ८ वर्षीय प्रणय प्रवीण लुडबे याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला याबाबत निवती पोलीस ठाण्यात कोचरा चव्हाटावाडी येथील सचिन हंजनकर यांनी याची फिर्याद दिली आहे. कोचरा चव्हाटावाडी येथील सचिन हंजनकर यांच्या जवळ सुट्टी निमित्त प्रवीण मधुकर लुडबे तसेच त्यांची पत्नी व मुलगा आले होते प्रवीण लुडबे हे…

Read More

बांदा येथील श्री वाळकेश्र्वर मंदिराचा वर्धापनदिन उद्या होणार साजरा…

बांदा /प्रतिनिधी . येथील श्री वाळकेश्वर मंदिराचा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दिनांक २० रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता महाआरती, दुपारी १.३० ते २.३० महाप्रसाद, स्थानिकांची भजने आदी कार्यक्रम होणार आहेत. लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष अभिजित रमेश वाळके यांनी केले आहे.

Read More

मालवणात २२ रोजी गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव

मालवण ता.१९-:* मालवण तालुका बौद्ध सेवा समिती मुंबई मुलुखी शाखा यांच्या वतीने गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव रविवार दि. २२ मे रोजी सकाळी १० वाजता मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी १० वा. दीपप्रज्वलन, बुद्ध वंदना, मान्यवरांचे स्वागत, सकाळी १०.३० वाजता १०.३० वा. दहावी, बारावी…

Read More

देवबाग येथील बंधाऱ्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे 4 कोटी निधी मंजूर…

उद्या आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन; हरी खोबरेकर यांची माहिती मालवण दि प्रतिनिधी देवबाग गावचे सागरी अतिक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याने राज्य शासनाच्या माध्यमातून ४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. देवबाग संगमापासून उत्तरेकडे ५१० मीटर लांबीचा याठिकाणी बंधारा होणार असून या बंधाऱ्याचे भूमिपूजन उद्या शुक्रवारी २० मे रोजी दुपारी १…

Read More

पर्यटन महोत्सव हायजॅक करून शिवसेनेकडून नगरपालिकेच्या आणि जनतेच्या पैशांची लूट – सुदेश आचरेकर

मालवण ता.१९-:* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अडवून ठेवून त्यांना सरकारच्या अधिपत्याखाली घेऊन आमदार, मंत्री यांच्या माध्यमातून त्यांच्यावर नियंत्रण ठेवून प्रशासनावर दबाव आणून लूट करण्याचे षडयंत्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने रचले आहे. याच धर्तीवर मालवण दांडी बीच येथे मालवण नगरपालिकेने आयोजित केलेला पर्यटन महोत्सव शिवसेनेने हायजॅक करून नगरपालिकेच्या आणि जनतेच्या पैशांची लूट केली आहे. महोत्सवासाठी बँका,…

Read More

देवबाग येथील बंधाऱ्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध…

२२ मे ला नारायण राणे यांच्या हस्ते भूमिपूजन… मालवण दि प्रतिनिधी सागरी अतिक्रमणग्रस्त देवबाग गावचे सागरी अजस्त्र लाटांपासून संरक्षण करण्यासाठी येथे तात्पुरता बंधारा बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मागील महिन्याच्या अखेरीस एक कोटींचा खासदार निधी उपलब्ध करून देण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. ना. राणेंच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या खासदार…

Read More

तळाशिल वासीयांना आमदार नाईक यांनी दिलेला शब्द पळाला

बंधाऱ्याच्या प्रत्यक्ष कामाला झाली सुरुवात, आमदारांच्या हस्ते झाला शुभारंभ मालवण ता.१९-:* समुद्राच्या लाटांपासून तळाशील गावाची होणारी धूप थांबविण्यासाठी दहा महिन्यांपूर्वी तळाशील ग्रामस्थांनी धूप प्रतिबंधक बंधारा होण्यासाठी उपोषण छेडल्यानंतर त्यावेळी तळाशील ग्रामस्थांना दिलेला शब्द आज मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पूर्ण करीत या बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ आमदार नाईक यांनी ग्रामस्थांच्या उपस्थित केला. तळाशील गावात बंधारा व्हावा…

Read More

३९ वर्षांनी मिळाले १९८३ च्या बॅचचे वर्गमित्र

शेठ म ग हायस्कुलच्या एसएससी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न देवगड ता.१९-:* देवगड येथील शेठ म.ग.हायस्कुल एसएससी माजी विद्यार्थी १९८३ बॅचचा स्नेहमेळावा बुधवारी (ता.१८ मे) तांबळडेग येथे उत्साहात संपन्न झाला. ३९ वर्षांनी एकमेकांना मित्र मैत्रिणी भेटल्याने सर्वांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले होते. सर्वप्रथम श्री गजबादेवी मातेचे दर्शन सर्वांनी घेतले योगायोगाने या मंदिराचा वर्धापन असल्याने प्रसाद घेऊन सर्व…

Read More

*कोकणातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी लवकरच मार्ग काढण्याचे राज्य कृषि आयुक्त श्री. धीरजकुमार यांचे आश्वासन

महिला काथ्या कामगार औद्योगिक संस्था, वेंगुर्लेच्या काथ्या प्रकल्पास भेट   वेंगुर्ले ता.१९-:* कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी एम. के. गावडे यांनी जिल्ह्यातील शाश्वत शेती बागायतीबाबत मांडलेल्या समस्या जाणून घेत राज्याचे कृषि आयुक्त श्री. धीरजकुमार यांनी, आपण लवकरच येत्या कांही दिवसात सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रगत शेतकरी प्रक्रिया उद्योग प्रतिनिधी व पुरस्कार प्राप्त शेतकरी यांचेशी सविस्तर चर्चा करुन सिंधुदुर्ग…

Read More
You cannot copy content of this page