मालवणात २२ रोजी गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव

मालवण ता.१९-:* मालवण तालुका बौद्ध सेवा समिती मुंबई मुलुखी शाखा यांच्या वतीने गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव रविवार दि. २२ मे रोजी सकाळी १० वाजता मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी १० वा. दीपप्रज्वलन, बुद्ध वंदना, मान्यवरांचे स्वागत, सकाळी १०.३० वाजता १०.३० वा. दहावी, बारावी उत्तीर्ण मुलांचे सत्कार, लहान मुलांची बुद्ध वंदना स्पर्धा बक्षीस वितरण, आदर्श सामाईक कार्यकर्ता पुरस्कार वितरण, ११ वा. जाहीर सभा, दुपारी ३ वा. बुद्ध – भीम गीतांचा नजराणा तसेच गावातील स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रबोधनकार वसंत हंकारे, बौद्ध सेवा समिती मुंबईचे अध्यक्ष अशोक कदम, प्रमुख पाहुणे म्हणून युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र कर्नाटक राज्य चे राज्य अध्यक्ष डॉ. संतोष भोसले, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुमेधा तेंडुलकर सौदागर यांसह अशोक वायंगणकर, ऍड. आनंद कासले, सुगंध तांबे, डॉ. शिरीष कदम, जनार्दन तांबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वानी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे मुलुख शाखा अध्यक्ष व स्वागताध्यक्ष राजेंद्र कदम यांनी केले आहे.

You cannot copy content of this page