कोचरा खाडीपात्रात बुडून ८ वर्षीय बालकाचा मृत्यू…

वेंगुर्ले ता १९-:* कोचरा खाडीपात्रामध्ये आंघोळीला गेलेल्या मुंबई येथील ८ वर्षीय प्रणय प्रवीण लुडबे याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला याबाबत निवती पोलीस ठाण्यात कोचरा चव्हाटावाडी येथील सचिन हंजनकर यांनी याची फिर्याद दिली आहे.

कोचरा चव्हाटावाडी येथील सचिन हंजनकर यांच्या जवळ सुट्टी निमित्त प्रवीण मधुकर लुडबे तसेच त्यांची पत्नी व मुलगा आले होते प्रवीण लुडबे हे मूळचे नारूर येथील असून ते मुंबई येथे राहतात आज (गुरुवार) हे सर्वजण आंघोळीसाठी कोचरा खाडीपात्रामध्ये गेले होते. दरम्यान ८ वर्षीय प्रणय लुडबे हा आंघोळ करत असताना पाण्यात बुडाला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला याबाबत निवती पोलीस ठाणे मध्ये फिर्याद दाखल केली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page