३९ वर्षांनी मिळाले १९८३ च्या बॅचचे वर्गमित्र

शेठ म ग हायस्कुलच्या एसएससी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

देवगड ता.१९-:* देवगड येथील शेठ म.ग.हायस्कुल एसएससी माजी विद्यार्थी १९८३ बॅचचा स्नेहमेळावा बुधवारी (ता.१८ मे) तांबळडेग येथे उत्साहात संपन्न झाला. ३९ वर्षांनी एकमेकांना मित्र मैत्रिणी भेटल्याने सर्वांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले होते. सर्वप्रथम श्री गजबादेवी मातेचे दर्शन सर्वांनी घेतले योगायोगाने या मंदिराचा वर्धापन असल्याने प्रसाद घेऊन सर्व मित्र मैत्रिणीनी स्वीमिंग पूल मध्ये पोहण्याचा खेळ खेळण्याचा आनंद लुटला.दुपारचे भोजन घेऊन आराम करून तांबळडेग बीच वर फिरण्याचा मौज मजा खेळ खेळण्याचा आनंद लुटला.

त्यानंतर सापशिडी, संगीत खुर्ची ,रेकॉर्ड डान्स करून सर्वांनीच मनसोक्त आनंद लुटला. परिचय, मनोगत दरम्यान काहींनी ३९ वर्षाच्या प्रवासातील कटू गोड अनुभव कथन करून हसवले आणि रडवलेही. यात प्रामुख्याने श्रीपाद पारकर,श्रीकृष्ण ठाकूर,विनय केळकर,प्रवीण पोकळे,धनंजय बिडये,शिवराम निकम,दयानंद मांगले,उत्तम पोकळे,निर्मला भिडे- रानडे ,नीलिमा मोंडकर ,आचरेकर,सुनीता महाडिक कजबजे,मदन मालवणकर ,अविनाश घाडी,नाना मोहिते,विजय माळवदे,पिरोज -जाचक-पार्टे,रोहिणी फाटक,कुर्लेकर ,उत्तम पोकळे,,राजेश खानविलकर,माधुरी जोशी -निकम, सुधा उपरकर-कोचरेकर,गुरुनाथ मोर्ये,किरण कुर्लेकर,यांनी सहभाग घेतला.मंकी रिसॉर्ट तांबळडेग(ता.देवगड) येथील रीसॉर्टमध्ये स्नेहमेळाव्यात,विशेषतः माजी विद्यार्थी विद्यमान नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर,रत्नागिरी येथील उद्योजक विजय माळवदे, तसेच हॉटेल,कापड,मच्छिमार, शासकीय सेवा,पत्रकार ,बँक सेवा शासकीय निमशासकीय सेवेत असलेले माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. स्नेह मेळाव्याची सुरवात गणेशाला वंदन करून मित्र मैत्रिणी परिचय ,करुन दिला. नोकरी व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या सर्वांशी संपर्क करून एकाच मंचावर आणण्याचे काम या निमीत्ताने केले.

त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर रंगली गाण्यांची मैफल, विडंबन काव्य,किस्से आणि वात्रटिका. स्नेहमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ३९ वर्षांनी जुने मित्र मैत्रिणी भेटणार म्हणून सर्वांनाच स्नेहमेळाव्याची प्रतीक्षा होती. कुणी येताना केक,आंबा बर्फी आणले, कुणी भाकरवाडी ,खारी बोरे,चकली आणली मजा मस्ती, गप्पा, गाणी, खाणे पिणे यात दिवस कधीच सरला कळले नाही. शेवटी आपला ग्रुप आणि मैत्री चिरंतन राहावी म्हणून प्रार्थना करून केक कापण्यात आला.

You cannot copy content of this page