बंधाऱ्याच्या प्रत्यक्ष कामाला झाली सुरुवात, आमदारांच्या हस्ते झाला शुभारंभ
मालवण ता.१९-:* समुद्राच्या लाटांपासून तळाशील गावाची होणारी धूप थांबविण्यासाठी दहा महिन्यांपूर्वी तळाशील ग्रामस्थांनी धूप प्रतिबंधक बंधारा होण्यासाठी उपोषण छेडल्यानंतर त्यावेळी तळाशील ग्रामस्थांना दिलेला शब्द आज मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पूर्ण करीत या बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ आमदार नाईक यांनी ग्रामस्थांच्या उपस्थित केला. तळाशील गावात बंधारा व्हावा यासाठी ग्रामस्थांनी १५ ऑगस्टला उपोषण छेडले होते उपोषण स्थळी ग्रामस्थांना आमदार वैभव नाईक यांनी बंधारा लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले होते.
गुरुवारी सायंकाळी तळाशील गावासाठी आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून घेतलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामाला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. तळाशील गावात तातडीने बंधारे बांधण्याचा शब्द आमदार नाईक यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले होते. या बंधाऱ्यांच्या कामाला सुरुवात झाल्याने आमदार नाईक यांनी तळाशील ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला आहे. या कामाचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितत केला.
यावेळी बबन शिंदे, तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर तोंडवळी सरपंच आबा कांदळकर, जयहरी कोचरेकर, संजय केळूसकर, विवेक रेवंडकर,नंदकिशोर कोचरेकर, विजय रेवंडकर, संजय जुवाटकर, भाऊ चोडणेकर, ताता टिकम,प्रकाश बापर्डेकर, महेश मालंडकर, चरण रेवंडकर, पतन अभियंता चंद्रकांत आयरेकर, सहाय्यक पतन अभियंता पी बी पवार, कनिष्ठ अभियंता समाधान जाधव आदी उपस्थित होते
