Global Maharashtra Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आज दांडी शाळेतील लहान मुलांना वह्या व खाऊ वाटप.

*⚡मालवण ता.२०-:* मालवण शहरातील दांडी येथील जि.प.शाळा येथे शिव जयंतीचे औचित्य साधून मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मेघनाद धुरी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रशाळेतील लहान मुलांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले आहे .हा कार्यक्रम विधानसभा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा पल्लवी तारी यांच्या सहकार्याने घेण्यात आला या कार्यक्रमात राष्ट्रीय काँगेसचे जेष्ठ…

Read More

देवाला लावलेल्या दिव्यामुळे खिडकीच्या प्लास्टिक आणि कपड्यांना आग…

वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला…. सावंतवाडी ता. 20: खिडकीपाशी देवाला लावलेल्या दिव्यामुळे खिडकीचे प्लास्टिक तसेच कपड्याला आग लागली ही घटना आज स 10 30 च्या सुमारास येथील बस स्थानक परिसरातील बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घडली. परिसरातील नागरिकांनी तात्काळ धावाधाव केल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला संबंधित फ्लॅटच्या खिडकीवर देवासाठी दिवा पेटवण्यात आला होता. तर त्या फ्लॅट…

Read More

देवाला लावलेल्या दिव्यामुळे खिडकीच्या प्लास्टिक आणि कपड्यांना आग…

वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला…. सावंतवाडी ता.२०:     खिडकीपाशी देवाला लावलेल्या दिव्यामुळे खिडकीचे प्लास्टिक तसेच कपड्याला आग लागली ही घटना आज स 10 30 च्या सुमारास येथील बस स्थानक परिसरातील बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घडली. परिसरातील नागरिकांनी तात्काळ धावाधाव केल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला      संबंधित फ्लॅटच्या खिडकीवर देवासाठी दिवा पेटवण्यात आला होता. तर…

Read More

रेवतळे महापुरुष संघाने पटकाविले छत्रपती चषक कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद

मालवण ता.२०-:* भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मालवण व महापुरुष रेवतळे मालवणच्या वतीने निमंत्रित संघाच्या छत्रपती चषक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शिवभवानी सावंतवाडी संघाला पराभूत करत महापुरुष रेवतळे मालवण संघाने विजेतेपद पटकावले. शिव भवानी सावंतवाडी संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. महापुरुष रेवतळे मालवण संघाचा खेळाडू ललित चव्हाण याला स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविण्यात आले….

Read More

तारकर्ली येथील मत्स्यव्यवसाय शाळेत शिवजयंती साजरी

मालवण (प्रतिनिधी) तारकर्ली येथील शासकीय मत्स्यव्यवसाय शाळेत शिवजयंती उत्सव साजरा झाला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशासह शिवकाळातील विविध वेशभूषा साकारत सर्वांचे लक्ष वेधले. तारकर्ली येथील मत्स्यव्यवसाय शाळेत विविध कार्यक्रम विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून पार पडतात. शिवजयंती उत्सवानिमित्त देखील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या काळातील विविध व्यक्तिरेखांच्या वेशभूषा साकारत हा उत्सव साजरा केला. लहान मुलांनी साकारलेल्या…

Read More

बॅ. नाथ पै युवाशक्ती पुरस्कार’ यशराज प्रेरणा संघटनेला प्रदान

बॅ. नाथ पै जन्मशताब्दी सोहळा विशेष कार्यक्रमाअंतर्गत आयोजन मालवण ता.२०:-* अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण तालुका शाखेचा ‘बॅ. नाथ पै युवाशक्ती पुरस्कार’ मालवण तालुक्यातील आचरे येथील ‘यशराज प्रेरणा’ ह्या युवा संघटनेला बाबूकाका अवसरे, बाबाजी भिसळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण तालुका शाखेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘बॅ. नाथ पै…

Read More

विविधांगी पर्यटनातून मालवणचा कायापालट करण्याबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधणार – हरी खोबरेकर

मालवण ता.२०-:* राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे उद्या दि. २१ फेब्रुवारी रोजी मालवणच्या दौऱ्यावर येत असून पर्यावरणाचा समतोल राखून विविधांगी पर्यटनातून मालवणचा कायापालट करण्याच्या दृष्टीने विविध पर्यटन उपक्रम राबविण्याबाबतचा आराखडा मंत्री आदित्य ठाकरे यांना मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार…

Read More

चिंदर सेवा संघाच्यावतीने भगवंतगड किल्ल्यावर आयोजित शिवजयंती उत्साहात संपन्न

मालवण ता.२०-:* छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिंदर भूमितील भगवंतगड या किल्ल्यावर चिंदर सेवा संघाच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त चिंदर गावातील प्राथमिक शाळेतील मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा व पोवाडे गायनाने परीसर दणाणून गेला होता. किल्ल्यावरील आराध्य दैवत श्रीदेव सिध्देशस्वराचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष संदिप पारकर, उपसरपंच दिपक सुर्वै,…

Read More

आंगणेवाडी जत्रेत कोरोना विषयक नियम पाळण्याचे आवाहन

मालवण ता.२०-:* आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीचा वार्षिकोत्सव दि. २४ फेब्रुवारी रोजी होत असून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आंगणेवाडी वार्षिकोत्सवात भक्तांनी गर्दी न करता कोरोनाविषयी नियमांचे तंतोतंत पालन करीत सहभागी होऊन श्री देवी भराडीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन आंगणे कुटुंबीय यांनी केले आहे. कोरोनाची तिसरी लाट जरी ओसरत असली तरी आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने करोना प्रतिबंधक…

Read More

आचरा येथे ९ मार्चला होम मिनिस्टर स्पर्धा

मालवण (प्रतिनिधी) आचरा येथील रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम येणाऱ्या ३२ स्पर्धक महिलांना प्रवेश देण्यात येणार आहे. विजेत्याला साईसमर्थ कलेक्शनच्या भावना मुणगेकर यांच्याकडून सेमी पैठणी देण्यात येणार आहे. उपविजेत्या होम मिनिस्टरला येथील सी–कॅफेच्या प्रणया टेमकर यांच्याकडून…

Read More
You cannot copy content of this page