*⚡कणकवली ता.०५-:* जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून निसर्ग मित्र परिवाराच्या वतीने मुंबई गोवा महामार्गानजिक तळेरे हायस्कूल पासून कोचरेकर पेट्रोल पंपांपर्यत आंबा,काजू,जांभूळ आदी विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर,सचिव राजेश जाधव,उपाध्यक्ष दत्तात्रय मारकड,माजी सरपंच शशांक तळेकर,सामाजिक कार्यकर्ते हनुमंत तळेकर,माजी उपसरपंच दिपक नांदलस्कर,राजेश भोगले,दळवी महाविद्यालयाचे प्राध्यापक हेमंत महाडिक,महाविद्यालयाचे विद्यार्थी,तसेच केसीसी कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
पर्यावरण दिनानिमित्त आज वृक्ष लागवड व संवर्धन,संगोपन मोहिमेची सुरुवात करण्यात आली.तळेरे हायस्कूल समोर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या उपक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांचे स्वागत करण्यात येऊन उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमास व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.
