ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेड्डीवार यांचा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
कणकवली ता.०५-:* कुंभार समाजबांधवांना जातीचा दाखल काढताना व मातीचा व्यवसाय करताना जिल्हा प्रशासनाकडून यापुढे कोणताही त्रास होणार नाही , याची काळजी घ्यावी , अशा सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे .
कुंभार समाजबांधवांना जातीचा दाखल काढताना व मातीचा व्यवसाय करताना जिल्हा प्रशासनाकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत समाजबांधवांनी महाराष्ट्र कुंभार समाज संघटनेचे अध्यक्ष सतीश दरेकर यांनी निवेदन दिले होते. त्यानंतर श्री . दरेकर यांनी ओबीसीमंत्री विजय वडेट्टीवार यांचे या प्रश्नी लक्ष वेधले होते . मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या दालनात विविध खात्याचे मंत्री व कुंभार समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमेवत बैठक घेतली .
या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडून समाजबांधवांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर त्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी , अशी सूचना वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे . संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकाम बोर्डाचे कामकाज त्वरित सुरु करावे , असे आदेशही खादी व ग्रामोद्योग अधिकाऱ्यांना देण्यात आले. बैठकीला महाराष्ट्र कुंभार समाज संघटनेचे उपाध्यक्ष यशवंत शेंदुलकर , कार्याध्यक्ष विलास गुडेकर , सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा . गणपत शिरोडकर , सुहास पिंकुळकर आदी उपस्थित होते . कुंभार समाजातील व्यक्तीस कोणताही फि व स्वामित्वधन न आकारता मातीची ५०० ब्रास मर्यादा ही अट काढून कोणताही मर्यादा ठेवू नये
शेतात वाहून आलेली माती व गाळ हा कुंभार समाजातील पारंपरिक विट व्यावसायिकांना शासकीय नियमानुसार मिळावा व पिढीजात कुंभार समाजातील लागणारा तात्पुरता बिगर शेती परवान्याची अट काढून टाकण्यात यावी , या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन श्री वडेट्टीवार यांनी दिले . दरम्यान , महाराष्ट्र कुंभार समाजाचे अध्यक्ष सतीश दरेकर यांनी सिंधुदुर्ग कुंभार समाज मेळाव्यात सांगितल्याप्रमाणे ही मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली . या बैठकीत कुंभार समाजबांधवांचे प्रश्न मार्गी लावण्यात आल्याबद्दल श्री . दरेकर यांचे सिंधुदुर्गातील कुंभार समाजबांधांनी त्यांचे आभार मानले .
