मच्छीमार ते थेट ग्राहक विक्री व्यवस्थेंतर्गत दुचाकी वितरण

मालवण ता.०५-:* पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेनुसार यासाठी मच्छीमार महिलांना स्कूटरमध्ये ६० टक्के सबसिडी देण्यात आली. या अंतर्गत मालवणममधील प्रयोगशील मच्छीमार महिला सौ. दीक्षा दीपक ढोके यांना वाहन वितरणाचा कार्यक्रम कोकण उपायुक्त देवरे यांच्या हस्ते पार पडला. मध्यस्थांना टाळून शेतमालाची (नारळ / आंबा) विक्री करण्याची योजना आम्ही सिंधुदुर्गात यशस्वी करून दाखविली.

मच्छीमार महिलांनी पारंपरिक पद्धतीने मत्स्यविक्री न करता मच्छीमार ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था अवलंबवावी, यासाठी आम्ही पुढाकार घेतला होता, असे यावेळी कोकण उपायुक्त महेश देवरे यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक मत्स्य आयुक्त रवींद्र मालवणकर, संजय माने (मुंबई), सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page