कोल्हापूर येथील युवकाचा सावंतवाडीत अपघात…

सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी केले उपजिल्हा रुग्णालयात दाखल

सावंतवाडी ता.०५-:* कोल्हापूर येथून आंबोली मार्गे गोवा येथे व्यवसायासाठी जाणाऱ्या युवकाचा रस्त्याचा अंदाज न आल्याने सावंतवाडी येथील श्री उपरलकर देवस्थानकडे अपघात झाला असून, या अपघातात त्या युवकाच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

यावेळी “त्या” ठिकाणावरून जाणाऱ्या एका प्रवाशाने त्या व्यक्तीला राजा शिवाजी चौक इथपर्यंत आणले. यावेळी त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी चे रवी जाधव तेथे उपस्थित होते. यावेळी त्या प्रवाशाने घटनेची माहिती देताच रवी जाधव यांनी त्या जख्मी प्रवाशाला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दाखल केले.

You cannot copy content of this page