तालुका भाजप कडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती उत्साहात साजरी…

वैभववाडी प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती वैभववाडी तालुका भाजपा कार्यालय येथे मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमापूजन करून भाजपा पदाधिकाऱ्यांनी अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. वाभवे वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षा नेहा माईनकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी भाजपा जिल्हा महिला सरचिटणीस स्नेहलता चोरगे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास थोडक्या शब्दात मांडला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी नवलराज काळे, युवा जिल्हा उपाध्यक्ष बंड्या मांजरेकर, स्वप्निल खानविलकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, आरोग्य शिक्षण संस्कृती सभापती रेवा बावदाने, बांधकाम सभापती विवेक रावराणे, महिला व बालकल्याण सभापती सुंदरी निकम, नगरसेवक रोहन रावराणे, नगरसेविका सौ यामिनी वळवी, नगरसेवक राजन तांबे, नगरसेविका सौ संगीता चव्हाण, महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी, माजी सभापती शुभांगी पवार, खांबाळे शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील, कोकिसरे शक्ती केंद्र प्रमुख प्रदीप नारकर, भाजप कार्यालय संपर्कप्रमुख अनंत फोंडके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. फोटो – वैभववाडी भाजपा कार्यालयात अहिल्यादेवी यांची जयंती साजरी करताना भाजपा पदाधिकारी.

You cannot copy content of this page