Headlines

Global Maharashtra Breaking News

माणगावमधील ‘समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद…

५०० हून अधिक नागरिकांची कामे मार्गी:महसूल विभागाच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक.. ⚡​कुडाळ ता.१३-: सामान्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत आणि प्रशासकीय कामे गतिमान व्हावीत, या उद्देशाने राबवण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना’ला माणगाव येथे मोठा प्रतिसाद मिळाला. कुडाळ तहसील कार्यालयामार्फत माणगाव येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात मंगळवारी सायंकाळी झालेल्या भव्य ‘समाधान शिबिरा’चा ५०० हून अधिक…

Read Full News

आपत्ती व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींनी सज्ज राहावे…

प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचे आदेश.. ⚡कणकवली ता.१३-:नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने अत्यावश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी ही फक्त तालुकास्तरावर किंवा महसूल यंत्रणेची नसून सर्वप्रथम गाव पातळीवर आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात, असे प्रतिपादन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले. येथील तहसीलदार कार्यालयात आयोजित नैसर्गिक आपत्ती आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी श्री. कातकर म्हणाले की, ग्रामपंचायतींनी आपल्या स्तरावर…

Read Full News

प्रभाग ३ मधील पाणी समस्येबाबत नगरसेवकांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा…

सबनीसवाडा, वैश्यवाडा व चितारआळी परिसरात सुरळीत पाणीपुरवठ्याच्या सूचना.. ⚡सावंतवाडी ता.१३- : सबनीसवाडा, वैश्यवाडा व चितारआळी परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक आनंद नेवगी व नगरसेविका मोहिनी मडगांवकर यांनी पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्याशी चर्चा करत संबंधित अधिकाऱ्यांची…

Read Full News

कुडाळ मध्ये १७ ला ९वी बौद्ध धम्म परिषद…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव करणार मार्गदर्शन.. कुडाळ : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या जिल्हा शाखा सिंधुदुर्ग, महिला जिल्हा शाखा व मुंबई जिल्हा शाखा, समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ९ वी बौद्ध धम्म परिषद रविवार दि. १७ मे रोजी सकाळी…

Read Full News

हडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

​⚡मालवण ता.१२-:कणकवली येथील विवेकानंद नेत्रालय आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, हडी (फेसकॉम संलग्न) यांच्या संयुक्त विद्यमाने हडी शाळा नं. २ (जठारवाडी) येथे ‘मोफत नेत्र तपासणी’ शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये ४० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यातील १२ जणांची मोतीबिंदू शस्त्रकीया तर १० जणांना अल्प दरात चष्मा वाटप करण्यात येणार आहे. दीपप्रज्वलन करून शिबिराचा शुभारंभ…

Read Full News

आंबोलीतील हिंदू संमेलनात धर्मरक्षणासाठी एकीचे आवाहन…

आमदार महेश लांडगे यांचे वक्तव्यमाऊली मंदिर येथे तीन गावांच्या संयुक्त हिंदू संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡आंबोली,ता.१३-: हिंदू धर्माला हजारो वर्षाची परंपरा आणि श्री रामाची मर्यादा आहे.नाशिक,पुणे,कोल्हापूर,यवतमाळ,लातूर,मुंबई सगळीकडे महिला मुलींवर अत्याचार करून त्यांना धर्म परिवर्तन करण्यासाठी उद्युक्त केल जात आहे.यात जिहादी आणि मुस्लिम आहेत.हिंदू मध्ये एकी नसल्यामुळे त्यांचा माज वाढला आहे.धर्म सुरक्षित राहिला तरच आपण सुरक्षित आणि…

Read Full News

सबनीसवाड्यात धोकादायक फांद्या हटवल्या; निशांत तोरसकर यांच्या पाठपुराव्याला यश…

आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाची तातडीने कार्यवाही; नागरिकांकडून समाधान व्यक्त, नगराध्यक्षांचेही मानले आभार.. ⚡सावंतवाडी ता.१३-:सबनीसवाडा येथील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक अवस्थेत लोंबकळणाऱ्या झाडांच्या फांद्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येकडे निशांत तोरसकर यांनी जातीनिशी लक्ष घालत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास संबंधित फांद्या स्वतः तोडून नगरपालिकेच्या…

Read Full News

कणकवलीत पुलाखाली आढळलेल्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह…

⚡कणकवली ता.१३-: शहरातील पेडणेकर ज्वेलर्स परिसरातील पुलाखाली एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दत्ताराम अंकुश जाधव (वय ३२, रा. ऑफिस महाडिक कॉम्प्लेक्स, कणकवली) हे १० मे २०२६ रोजी सकाळी ८:३० वा….

Read Full News

गाडीची हवा सोडण्यापेक्षा प्रशासनात लक्ष घाला…

सावंतवाडी पंचायत समितीचा कारभार रामभरोसे; गुरुदास गवंडे.. ⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी पंचायत समितीला वालीच कोण नाही पंचायत समितीचा कारभार रामभरोसे चालू आहे सावंतवाडी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तपासणी करता सातारा येथे गेले असून आठ दिवस पंचायत समितीला वालीच कोणी नाही. सावंतवाडी प्रभारी गटविकास अधिकारी यांना विचारले…

Read Full News

शाळांना नवसंजीवनी; पटसंख्येचे निकष शिथिल केल्याने शाळा वाचवा मंचाकडून स्वागत…

६ वी ते ८ वीच्या वर्गांनाही सवलत देण्याची शासनाकडे मागणी.. ⚡सिंधुदुर्ग दि.१३-: १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामुळे कोकणातील माध्यमिक शाळा बंद पडण्याच्या उंबरठ्यावर होत्या. मात्र, ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ मंचाने दिलेल्या लढ्याला यश आले असून, शासनाने पटसंख्येचे निकष शिथिल केल्यामुळे शेकडो शाळा बंद होण्यापासून वाचल्या आहेत. या निर्णयाचे शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत होत असून, मंचाने…

Read Full News

You cannot copy content of this page