आंतरमहाविद्यालयीन पखवाज वादन स्पर्धेत मसुरेचा रथराज तुरी प्रथम
⚡मालवण ता.३१-: मुंबई विद्यापीठ संलग्न, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाने ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन पखवाज वादन स्पर्धेत मसुरे देऊळवाडा गावचा सुपुत्र व मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या कु.रथराज तुरी या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी रथराज याला पखवाज विशारद गुरुवर्य सचिन कातवणकर यांचे मार्गदर्शन आणि वडील…
