मालवण (प्रतिनिधी)
असरोंडी येथील असरोंडी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यामंदिर मधील सन २००९-१० च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेची गरज ओळखून पोर्टेबल साऊंड सिस्टीम शाळेला प्रदान केली.
पोर्टेबल साऊंड सिस्टीम यंत्रणा शाळेच्या सहशालेय कार्यक्रमासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ही गरज ओळखून असरोंडी माध्यमिक विद्यामंदिरच्या २००९- १० सालच्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी आदित्य सावंत, दयानंद कदम, प्रतिक सावंत, सत्यवान कोकम, सुर्यकांत खरात, मीनाक्षी सावंत या माजी विद्यार्थ्यांनी सदर कामी पुढाकार घेतला. प्रतिक सावंत, आदित्य सावंत, प्राची सावंत, सुशांत परब, श्रीपाद राणे, ममता परब, मयुरी सावंत, विनायक सावंत, विद्या मिरजकर, अमोल घाडी, भगवान कोकरे, दिपाली मेस्त्री, मीनाक्षी सावंत, सुरेंद्र सावंत, गोविंद राणे, ममता राणे, दिपाली आडेलकर, सुनील राणे, अभय राणे, राजेश घाडीगांवकर, दयानंद कदम, सुर्यकांत खरात, लवू शिंदे, दीपक घाडीगावकर, सत्यवान कोकम, समीर सावंत यांच्या सहयोगातून निधी जमा करून ही साउंड सिस्टीम उपलब्ध करण्यात आली. ही सिस्टीम विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक सुशांत रावसाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.
शाळेसाठी आवश्यक यंत्रणांसाठी निधी जमा करुन शाळेला गुरुदक्षिणा दिल्याबद्दल २००९-१० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष विजय सावंत, सचिव प्रकाश सावंत आणि सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक सुशांत पाटील, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी आभार मानले आहेत.
