उपसपंच हनुमंत पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली रेडकरवाडी युवकांनी एकत्र येत केली साफसफाई
⚡सावंतवाडी ता.३१सहदेव राऊळ-: मळगाव येथील १७ नंबर हायवे ते रेडकरवाडी रस्त्याची मळगाव उपसपंच हनुमंत पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली रेडकर वाडीतील युवकांनी एकत्र येत श्रमदानातून साफसफाई केली.
१७ नंबर हायवे ते रेडकरवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती. त्यामुळे वाहने चालवताना वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना चालतानाही त्रास होत होता. याची दखल घेत रेडकरवाडीतील युवकांनी एकत्र येत या रस्त्याची साफसफाई केली. यावेळी रस्ता दुतर्फा वाढलेली लहान तसेच मोठी झाडी तोडून रस्ता मोकळा करण्यात आला.
या श्रमदानात मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांच्यासहीत अनिकेत रेडकर, विष्णू पेडणेकर, विनय पेडणेकर, अमित मांजरेकर, संतोष रेडकर, पारस पेडणेकर, आयुष पेडणेकर, रूणाल पेडणेकर, प्रसाद रेडकर, दिवाकर सातार्डेकर, दयानंद मातोंडकर, पार्थ सातार्डेकर, प्रदीप राणे व राजेंद्र रेडकर यांनी श्रमदान केले. श्रमदानातून रस्त्याची साफसफाई केल्याबद्दल रेडकर वाडीतील ग्रामस्थांनी या सर्वांचे कौतुक केले आहे
