न्हावेली ग्रामस्थांमधून होत आहे मागणी
⚡सावंतवाडी ता.३१.- गणेश चतुर्थी सण अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला असून न्हावेली गावात नेहमी विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. वाहिन्यांना लागणारी झाडीझुडपे त्रासदायक ठरत असून वीज समस्या संदर्भात विचारणा केली असता वायरमनकडून उध्दट उत्तरे मिळत असल्याने न्हावेली गावासाठी स्वतंत्र वायरमनची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थामधून होत आहे
न्हावेली गावातील विजेसंदर्भात तक्रारीसाठी ठेवण्यात आलेले तक्रार बुक सन २०१७ पासून वायरमनने पाहिलेलेसुध्दा नाही, किंवा तक्रार निवारण केल्याचा कोणताही उल्लेख नाही. वीज वाहिन्यांना लागणारी झुडपे प्रशासनाने सफाई न केल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. याचा परिणाम नळपाणी योजनेवर होत असून पावसाळ्यात पाण्यासाठी महिलाना भटकावे लागत आहे. उन्हाळ्यात वाहिन्यांना लागणारी झाडी झुडपे न तोडल्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. वीजबिल वेळेवर भरुनही अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने आम्हाला लोकशाहिचा मार्ग पत्करावा लागणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हटले आहे ल, अन्यथा तीव्र आंदोलन उभे करावे लागेल असा इशाराही ग्रामस्थांनी केला आहे.
