कडोबा बचतगटाचे शिवसेनेच्यावतीने अभिनंदन

कांदळवन संवर्धनासाठी राज्यात मिळाला आहे प्रथम क्रमांक

⚡वेंगुर्ला ता.३१-: महाराष्ट्रात कांदळवन संवर्धनामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या व कांदळवन संवर्धनासाठी प्रभावी कार्य केलेल्या कडोबा बचत गट टांक यांचा वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्यावतीने अध्यक्ष नरेंद्र मोंडकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी तालुकाप्प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सचिन देसाई, महिला तालुका संघटीका सुकन्या नरसुले, शहर समन्वयक विवेक आरोलकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, माजी नगरसेवक तुषार सापळे, वायंगणी सरपंच सुमन कामत, संजय गावडे, श्रीकांत घाटे, संजय परब, उमेश नाईक, मनोहर येरम, सागरतीर्थ सदस्य सौ.कुडव, नेहा साळगावकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कडोबा बचत गटाचे सचिव निलेश प्रभू, सदस्य नंदकिशोर गवंडे, प्रसाद आचरेकर, बाबाजी आरोंदेकर, प्रभाकर मोंडकर, राजन मोंडकर, सुचित गावकर, रघुनाथ मोंडकर, सुहास मोंडकर, सुनील चोपडेकर, राधाकृष्ण पेडणेकर, निकेश प्रभू, बेंजामिन फर्नांडिस, आदित्य तांडेल, रेजिनल फर्नांडिस, निवृत्ती तांडेल, राजन चोपडेकर, राजेश मोंडकर, नरेश तांडेल आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page