Headlines

जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत भोसले सैनिक स्कूलचे सुयश…

एकोणीस वर्षांखालील मुलींच्या संघाचे विजेतेपद; विभागीय फेरीसाठी निवड..

⚡सावंतवाडी ता.१०-: जय गणेश स्कूल, मालवण येथे झालेल्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले. एकोणीस वर्षांखालील मुलींच्या गटात शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले असून कोल्हापूर विभागीय फेरीसाठी संघाची निवड झाली आहे. या विजयी संघात दहावीतील अद्विता दळवी, नववीतील श्रावणी सोमवंशी तसेच आठवीतील विधी पटेल, श्रावणी गुरव आणि किंजल लोके यांचा समावेश आहे.

वैयक्तिक निवड चाचणीतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. दहावीतील अब्दुर रहमान मोहम्मद याची एकोणीस वर्षांखालील मुलांच्या गटातून, तर नववीतील लिखित भानुशाली याची सतरा वर्षांखालील मुलांच्या गटातून विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन हरमलकर व एस्तर परेरा यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ॲड. डॉ. अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई तसेच प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आगामी विभागीय फेरीसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page