Global Maharashtra Breaking News

घुमडे शाळेच्या शिक्षिका सौ. सरिता नाईक- भाबल यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

मालवण ता.०३-:* महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षकभारती मालवणच्या वतीने घुमडे शाळेच्या शिक्षिका सौ. सरिता नाईक- भाबल यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिक्षक भारतीच्या जिल्हा महिला आघाडी सरचिटणीस सौ. वैशाली गर्कळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ओमसाई गणेश कार्यालय, कट्टा येथे झालेल्या कार्यक्रमात सौ. सरिता नाईक यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मालवण पंचायत…

Read More

सेवांगणतर्फे दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन

*⚡मालवण ता.०३-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त ६ ते १० मे या कालावधीत दशावतार नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये दि. ६ रोजी वालावलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, ओसरगाव यांचे ‘क्रोधमाला’ नाटक, ७ रोजी महापुरुष दशावतार नाट्य मंडळ सावंतवाडी यांचे ‘प्रलयकारी गणेश’ नाटक, ८ रोजी…

Read More

गोव्याचा विजय कार्यकर्ते व जनतेचा

पुन्हा सत्ता येणार असल्याचा व्यक्त केला होता विश्वास;भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंदशेठ तानवडे सावंतवाडी : गोव्यातील विजय हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा विजय आहे.गोव्यात भाजपचे सरकार येणार हे मी पूर्वीच सांगितले होते.सर्व वरिष्ठ नेत्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्यामुळेच हे सर्व शक्य झाले असे मत गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंदशेठ तानवडे यांनी व्यक्त केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी गोव्यात…

Read More

शिशुविहार काळे आजींच्या बालवाडीतील पहिलीत जाणाऱ्या शिशुंचा निरोप समारंभ संपन्न

मालवण ता.०३-:* मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मध्ये चालणाऱ्या शिशुविहार- काळे आजींच्या बालवाडीतील पहिलीत जाणाऱ्या शिशुंचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. यानिमित्त मुलांनी सहल व वनभोजन, वेशभूषा व नृत्य करत धमाल मजामस्ती केली. तर मुख्य निरोप समारंभात मुलांना खाऊ वाटप करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. शिशुविहार काळे आजींच्या बालवाडीत शैक्षणिक…

Read More

जातीच्या दाखल्यांबाबत गाबित समाजाला न्याय देण्याची शासनाकडे मागणी

मालवण ता.०३-:* जात पडताळणी आणि जातीचे दाखले मिळवण्यासाठी गाबित समाज बांधवांना येत असलेल्या अडचणींबाबत तांत्रिक मार्गदर्शनासाठी कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी प्रांताधिकाऱ्यांसमवेत देवगड, मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी येथे बैठक आयोजित करण्यात यावी. यासंदर्भात महसूल आणि जात पडताळणी विभागाने संयुक्तपणे लवकरात लवकर कार्यवाही करून गाबित समाजातील लोकांवर होत आसलेला अन्याय दूर करावा, अशी मागणी मालवण तालुका गाबित…

Read More

भावी काणेकर हिच्या पहिल्या इंग्रजी काव्यसंग्रहाचे प्रकाशन

कणकवली ता.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याची कन्या भावी काणेकर हिच्या पहिल्या विथइन द वॉलस ऑफ माय माईंड या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुंबई येथे व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, डॉ. वैशाली वावीकर यांच्या हस्ते आणि रसिकांच्या उपस्थितीत झाले. यावेळी या काव्यसंग्रहाचे कौतुक करण्यात आले.  भावी काणेकर ही मालवण तालुक्यातील तळगाव येथील असून तिच्या या कविता लेखनासाठी आई वडिलांसह शिक्षकांनीही प्रोत्साहन दिले…

Read More

कॉन्स्टेबल संदीप राठोड यांना महासंचालक पदक महाराष्ट्र दिनी वितरण

वैभववाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग पोलिस दलात उल्लेखनीय काम केल्याबद्दल वैभववाडी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांचा पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मान करण्यात आला. १ मे कामगार दिनाचे औचित्य साधून ओरोस येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संदीप राठोड यांना सन्मानचिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी…

Read More

मालवण येथे 15 वर्षाखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

एम्. क्रिकेट ॲकॅडमीचे आयोजन : 4 मे ते 10 मे पर्यंत रंगणार स्पर्धा *⚡सावंतवाडी ता.०३-:* येथील एम् क्रिकेट अॅकॅडमीच्या वतीने १५ वर्षाखालील लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा मालवण बोर्डींग मैदानावर ४ मे ते १० मे पर्यंत होणार आहे . या एम् क्रिकेट अॅकॅडमीच्या वतीने आयोजित १५ वर्षाखालील लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन…

Read More

व्यापारी पतसंस्थेकडून उद्यमशील महिलांसाठी सुवर्णालंकार खरेदी कर्ज योजना

मालवण ता.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार उदिमात कार्यरत असणाऱ्या उद्यमशील महिलांना त्यांच्या आवडीचे सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी व्यापारी पतसंस्थेतर्फे महिलाप्रधान सुवर्णालंकार खरेदी कर्ज योजना अक्षय्य तृतियेपासून सुरू करण्यात, येत आहे. प्रायोगिक तत्वावर येत्या वटपौर्णिमेपर्यंत म्हणजे १४ जूनपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. या कर्ज योजनेंतर्गत फक्त व्यापारउदिम करणाऱ्या महिलांनाच दागिने खरेदीसाठी अधिकतम १ लाख रुपयांपर्यंतचा पतपुरवठा…

Read More

कणकवलीत श्री बसवेश्वर महाराज जयंती उत्साहात साजरी

कणकवली ता.०३-:* कणकवली शहरात अक्षय तृतीयेच्या महूर्तावर लिंगायत समाजाचे आराध्य दैवत श्री .बसवेश्वर महाराज यांची जयंती प्रतिवर्षी प्रमाणे साजरी करण्यात आली. मंगळवारी कांबळे गल्ली येथील नियोजित लिंगायत समाज मंदिर जागेत श्री .बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात व विधिवत धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.जिह्यातील शासकीय कार्यालयात श्री .बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले….

Read More
You cannot copy content of this page