नट वाचनालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

बांदा/प्रतिनिधी
येथील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू असलेल्या नट वाचनालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
. यावेळी वाचनालयचे अध्यक्ष एस आर सावंत, कार्यवाह राकेश केसरकर, संचालक शंकर नार्वेकर, निलेश मोरजकर, संचालिका स्वप्नीता सावंत, अनंत भाटे, प्रकाश पाणदरे, अंकुश माजगावकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक-मोरजकर, सुनील नातू, अमिता परब, सचिन चांदेकर यांच्यासह वाचक उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमपूजन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित अनेक प्रसंग व त्यांचे जीवनकार्य याविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.
फोटो :-
बांदा नट वाचनालयात अभिवादन करताना पदाधिकारी व वाचनप्रेमी ग्रामस्थ.

You cannot copy content of this page