बिले भरली नसल्याने आहेत बंद
दुर्गम तालुका असल्याने दोडामार्ग तालुक्यातील ही सेवा सुरू करावी;प्रवीण गवस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
⚡दोडामार्ग ता.०२-: दोडामार्ग तालुका हा दुर्गम भाग असून प्रामुख्याने हत्ती व जंगली श्वापदांचा वावर सतत असतो.तसेच रात्रीच्या वेळी या भागात रहदारी सुद्धा सुरू असते.यापूर्वी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत स्ट्रिट लाईटची व्यवस्था केलेली होती. परंतु आता विज देयके भरली नसल्यामुळे सदर दिवाबत्ती बंद करण्यात आली आहे.
स्ट्रिट लाईट बंद केल्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना काळोखातून प्रवास करावा लागत आहे. स्ट्रिटलाईट सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना गेल्या कित्येक महिन्यां पासून याचा त्रास सहन करावा लागत आहे.सर्वात मोठा सण गणेश चतुर्थी अगदी महिन्याभराच्या अंतरावर असताना जिल्ह्यातील जास्तीत जास्त भागातील स्ट्रीट लाईट बंद आहेत.यावर मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः लक्ष घालून या संदर्भात तसेच विज देयकांबाबत महावितरण कंपनीला योग्य त्या सूचना द्याव्यात व स्ट्रीट लाईट सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली.
