नील, चिन्मय, श्रावणी प्रथम
आरोस येथे जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा संपन्न

⚡सावंतवाडी ता.०२-: तालुक्यातील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस येथे कै. विद्याधर श्रीपाद शिरसाट स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा सोमवारी प्रशालेत संपन्न झाल्या. यात नील बांदेकर (बांदा), चिन्मय कोटणीस (सावंतवाडी), आणि श्रावणी आरावंदेकर (कुडाळ) यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस येथे सोमवार दि. १ ऑगस्ट २०२२ रोजी कै. विद्याधर श्रीपाद शिरसाट यांच्या दहाव्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस, विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस व पारिजात फ्रेंड सर्कल आरोस यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा संपन्न झाल्या. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन पालक – शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संतोष पिंगुळकर, पालक संघ सदस्य ज्ञानेश्वर चैताली दाभोलकर, रामदास नाईक, श्री. रेडकर, प्रभारी मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, ज्येष्ठ शिक्षक श्री. सावंत व श्री. बागवे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर स्पर्धेचे मुख्य परीक्षक प्रा. रुपेश पाटील, चंद्रकांत सावंत, राहुल कदम उपस्थित होते.
यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेत पहिली ते चौथी गटात प्रथम क्रमांक नील नितीन बांदेकर (पूर्ण प्राथमिक शाळा – बांदा), द्वितीय पार्थ उमेश सावंत (सुधाताई कामत विद्यालय, सावंतवाडी), तृतीय यश प्रवीण सावंत (मदर क्विन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी) तर उत्तेजनार्थ क्रमांक दूर्वा अतुल केसरकर, आस्था अमित लिंगवत यांना देण्यात आले
पाचवी ते सातवी या गटात प्रथम चिन्मय विक्रम कोटणीस (जिल्हा परिषद शाळा नंबर – २ सावंतवाडी), द्वितीय शमिका सचिन चिपकर (कुडाळ हायस्कूल, कुडाळ) तर तृतीय अस्मि प्रवीण मांजरेकर (आरपीडी हायस्कूल, सावंतवाडी) व उत्तेजनार्थ सई स्वागत नाटेकर (कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी) व प्राची मदन मुरकर यांना मिळाले.
आठवी ते दहावी गटामध्ये प्रथम क्रमांक श्रावणी राजन आरावंदेकर (कुडाळ हायस्कूल, कुडाळ), शरयू देवेंद्र कुबल (आरोस पंचक्रोशी विद्यालय, आरोस), तृतीय गायत्री बापू निर्गुण (माऊली माध्यमिक विद्यालय, सोनुर्ली) तर उत्तेजनार्थ क्रमांक प्रांजल मुकुंद परब व श्वेता सुरेश मरकर यांना मिळाले कार्यक्रमाचे परीक्षक प्राध्यापक रुपेश पाटील चंद्रकांत सावंत व राहुल कदम यांनी सर्व स्पर्धकांना व उपस्थित पालकांना कथाकथन स्पर्धेविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सुषमा मांजरेकर यांनी केले. सूत्रसंचालन मोहन पालेकर यांनी तर आभार प्रदर्शन निलेश देऊलकर यांनी केले.
स्पर्धेची सर्व बक्षीसे माधवी विद्याधर शिरसाट व अनिरुद्ध विद्याधर शिरसाट यांनी पुरस्कृत केली होती. प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकाना रोख पारितोषिके, स्मृती चषके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page