मालवण तालुका काँग्रेसची उद्या तातडीची बैठक

⚡मालवण ता.०२-: मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची तातडीची बैठक बुधवार दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता मालवण फोवकांडा पिंपळ येथे पदाधिकारी अरविंद मोंडकर यांच्या निवासस्थानी आयोजित केली आहे.

या बैठकीस जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष इर्शाद शेख उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत भविष्यात होणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणूक यासह पक्षसंघटना बळकटी साठी प्रयत्न करण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. तालुक्यातील काँग्रेसचे सर्व सेल, विभाग पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page