Headlines

Global Maharashtra Breaking News

हल्ल्याच्या निषेधाचा हटवलेला “तो” बॅनर पुन्हा लावला

कणकवली नगरपंचायतकडे बॅनर ची “फी” भरून बॅनर नियमानुकुल कणकवली 3 ऑगस्ट (प्रतिनिधी)-कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करणारा लावलेला बॅनर नगरपंचायतने हटवल्यानंतर या संदर्भात रीतसर नगरपंचायत कडे फी भरल्यानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा बॅनर लावण्यात आला. कणकवली शहरात लावलेल्या या बॅनर मुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या….

Read More

अण्णा भाऊ हे व्यक्तीकडून समष्टीकडे घेवून जाणारे लोकलेखक:अजय कांडर

⚡कणकवली ता.०३-: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी भुकेचा प्रश्न प्रथम हाताळला. त्यांनी आपल्या कथा, कादंबऱ्यातून बहुजन समाजातील अनेक प्रश्नांना न्याय मिळवून दिला. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे व्यक्तीकडून सुरू होते ते समष्टीकडे जाऊन भिडते. अण्णा भाऊ साठेची केवळ जयंती न करता अण्णा भाऊंच्या विचाराचा आणि साहित्याचा जागर करायला हवा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय…

Read More

अनधिकृत तक्रारींचा मच्छीमारांनी वाचला पाढा

सामुदायिक संपर्क कार्यक्रम संपन्न;परप्रांतीय, पर्सनेट, एलईडी मच्छीमारी बाबत व्यक्त केली नाराजी ⚡देवगड ता.०३-: भारतीय नौसेना, तटरक्षक दल, पोलिस आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देवदूर्ग मच्छिमारी संस्था सभागृहात आयोजित सामुदायिक संपर्क कार्यक्रमामध्ये मच्छिमारांनी परप्रांतीय,पर्सनेट व एलईडी मच्छिमारीद्वारे होत असलेल्या अनधिकृत मच्छिमारीचा तक्रारीचा पाढा वाचला.याबाबत सबंधित यंत्रणाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याबाबत मच्छिमारांनी नाराजी व्यक्त केली….

Read More

उदय सामंत हल्ल्याच्या निषेधाचा कणकवलीत बॅनर झळकला आणि तात्काळ गायबही झाला

कणकवली 3 ऑगस्ट (प्रतिनिधी)-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ,राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्यावर पुणे कात्रज येथील चौकात झालेल्या हल्ल्याचा कणकवलीत निषेध करण्यात आला. माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करत असल्याचा बॅनर लावण्यात आला मात्र तो बॅनर सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास उदय सामंत प्रेमी…

Read More

वराडकर हायस्कुलतर्फे देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.०३-: कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १० ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते बारावी, महाविद्यालयीन व खुल्या अशा गटात होईल. एका गटात ६ ते १० स्पर्धक असतील. प्रत्येक गटातून विजेता व…

Read More

कणकवली काॅलेज मध्ये रानभाज्या महोत्सव

⚡कणकवली ता.०३-: येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या काॅलेज कणकवलीच्या आय. क्यू. ए. सी., व सायन्स असोसिएशन आणि स्नेह सिंधु कृषी पदवीधर संघ, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रानभाज्या महोत्सव २०२२’ अंतर्गत रानभाज्या प्रदर्शन व रानभाज्या पाककला स्पर्धेचे आयोजन शनिवार ६ऑगस्ट २०२२ रोजी कणकवली काॅलेज, कणकवली येथे केले असून विद्यार्थ्यी व नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे प्राचार्य, कणकवली…

Read More

निष्ठावंत शिवसैनिक म्हणणाऱ्यांना शिवसेनेचा इतिहास तरी माहीत आहे का ?

तर जुने शिवसैनिक रस्त्यावर उतरतील;जेष्ठ शिवसैनिक माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांचा इशारा मालवण (प्रतिनिधी) शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आणि स्वतःला निष्ठावंत म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे व आमदारांना शिवसेनेचा इतिहास तरी माहीत आहे का ? शिवसेना या चार शब्दांचा अर्थ या आमदारांनी सांगावा. आम. दीपक केसरकर, उदय सामंत यांचे शिवसेनेतील वय किती ? बाहेरून शिवसेनेत आलेल्यानी आणि विकले…

Read More

जयसिंग पाटील यांचे योगदान भंडारी हायस्कूल कायम स्मरणात ठेवेल

सेवानिवृत्ती सत्कार प्रसंगी भंडारी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष विजय पाटकर यांनी दिला विश्वास ⚡मालवण ता.०३-: विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविलेले जयसिंग पाटील हे स्वतः उत्तम खेळाडू असल्याने मालवणच्या भंडारी हायस्कुल मध्ये त्यांनी एक उत्तम क्रीडाशिक्षक म्हणून तसेच वडाचापाट येथिल शांतादुर्गा हायस्कुलचे मुख्याध्यापक म्हणून उत्तम कामगिरी बजावली. क्रीडा क्षेत्रातील भंडारी हायस्कुलच्या यशात पाटील यांची मेहनत मोठी आहेच…

Read More

आदर्श शिक्षक, शाळा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नगर वाचनालय वेंगुर्ले: २० ऑगस्ट पर्यंत पाठविता येणार प्रस्ताव वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरवाचनालयातर्फे तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी जे.एम.गाडेकर व अनिल सौदागर यांनी दिलेल्या देणगीतून आदर्श शिक्षक / शिक्षिका व गं.भा.गंगाबाई पांडुरंग जोशी स्मरणार्थ आदर्श शाळा पुरस्कार सन २०२१-२२ देण्यात येणार आहेत. यासाठी संपूर्ण माहिती भरलेले अर्ज २० ऑगस्टपर्यंत ग्रंथपाल, नगरवाचनालय, वेंगुर्ला यांच्याकडे ग्रंथालयाच्या कामकाजाच्या…

Read More

वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ग्रंथालयांनी पुढाकार घेतला पाहिजे

जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांचे आवाहन वेंगुर्ला प्रतिनिधी- कोरोना प्रादुर्भावानंतर बदलत्या परिस्थितीमुळे सर्वच क्षेत्रात फरक पडला आहे. वाचकांच्या वाचनात खंड पडत आहे. त्यामुळे ग्रंथालयांनी ही या बदलत्या परिस्थितीचा विचार करुन बदलले पाहिजे. ग्रंथालयांचा ग्रुप करा. दरदिवशी निदान ५ पुस्तके तरी व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवा. त्यांना आवड निर्माण झाल्यावर ते ग्रंथालयाकडे पुन्हा वळतील असे…

Read More
You cannot copy content of this page