⚡मालवण ता.०३-: कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १० ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते बारावी, महाविद्यालयीन व खुल्या अशा गटात होईल. एका गटात ६ ते १० स्पर्धक असतील. प्रत्येक गटातून विजेता व उपविजेता संघ निवडला जाईल. गट १ व २ मधील विजेत्यांना प्रत्येकी ७५०, तर उपविजेत्यास ५५० रुपये, गट ३ व ४ मधील विजेत्यास १ हजार, तर उपविजेत्यास ७५० रुपये देण्यात येणार आहे. विजेत्या संघांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी ७ ऑगस्टपर्यंत संजय पेंडुरकर (९४२२३९२७९०), समीर चांदरकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वराडकर हायस्कुलतर्फे देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन
