उदय सामंत हल्ल्याच्या निषेधाचा कणकवलीत बॅनर झळकला आणि तात्काळ गायबही झाला

कणकवली 3 ऑगस्ट (प्रतिनिधी)-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ,राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्यावर पुणे कात्रज येथील चौकात झालेल्या हल्ल्याचा कणकवलीत निषेध करण्यात आला. माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करत असल्याचा बॅनर लावण्यात आला मात्र तो बॅनर सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास उदय सामंत प्रेमी शिवसैनिकांनी लावला होता. मात्र कणकवली नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ काही वेळातच शिवाजी चौकात दाखल होत निषेधाचा बॅनर हटवला.

कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावलेला हा बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो वरील बाजूस लावले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटाचे प्रवक्ते माजी पालकमंत्री व सावंतवाडी चे आमदार दीपक केसरकर यांचे देखील फोटो या बॅनरवर लावले होते. शिवसेना सिंधुदुर्ग असा या बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे. माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कणकवलीत देखील पडसाद उमटले आहेत.
कणकवली नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ काही वेळातच शिवाजी चौकात दाखल होत निषेधाचा बॅनर हटवला. यावेळी शिवाजी चौकात बंदोबस्तासाठी उपस्थित असणारे पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.मात्र कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस बंदोबस्त असताना हा बॅनर लावला कुणी? बॅनरला नगरपंचायत प्रशासनाने परवानगी दिली होती का?असे सवाल निर्माण झाले होते.

You cannot copy content of this page