सामुदायिक संपर्क कार्यक्रम संपन्न;परप्रांतीय, पर्सनेट, एलईडी मच्छीमारी बाबत व्यक्त केली नाराजी
⚡देवगड ता.०३-: भारतीय नौसेना, तटरक्षक दल, पोलिस आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देवदूर्ग मच्छिमारी संस्था सभागृहात आयोजित सामुदायिक संपर्क कार्यक्रमामध्ये मच्छिमारांनी परप्रांतीय,पर्सनेट व एलईडी मच्छिमारीद्वारे होत असलेल्या अनधिकृत मच्छिमारीचा तक्रारीचा पाढा वाचला.याबाबत सबंधित यंत्रणाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याबाबत मच्छिमारांनी नाराजी व्यक्त केली.
नेव्ही, कोस्टगार्ड, पोलिस व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छिमारांना सागरी सुरक्षेबाबत घ्यावयाची दक्षता, नौकांवर वापरण्यात येणारी यंत्रणा, खराब हवामान असल्यास घ्यावयाची काळजी, नौकांवर आवश्यक असणारी कागदपत्रे, समुद्रात संशयास्पद आढळल्यास द्यावयाची खबरदारी आदी विषयांबाबत सामुदायिक संपर्क कार्यक्रमाचे आयोजन करून मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला नौदलाचे लेफ्टनंट एम्.विनयकुमार, कोस्टगार्ड अधिकारी आर.बी.बनकर, नौदलाचे अधिकारी राधेशाम यादव, मनवीर qसग, देवगड पोलिस निरिक्षक निळकंठ बगळे, बंदर अधिकारी एस्.पी.आवळे,उमेश महाडिक, वनरक्षक आर.एल्.बिक्कर, एन्.एन्.साठे, सागर पोलिस दल पोलिस उपनिरिक्षक जितेंद्र साळूंखे, पीएस्आय कांबळे, साठे, जगताप, कुंभार, तांडेल, पो.कॉ.निलेश पाटील, देवदूर्ग मच्छिमारी सहकारी संस्था चेअरमन चंद्रकांत पाळेकर, देवगड \िशरमेन्स सोसायटी चेअरमन द्विजकांत कोयंडे, तारामुंबरी मच्छिमारी संस्था चेअरमन विनायक प्रभू आदी उपस्थित होते.
सामूदायिक संपर्क कार्यक्रमाअंतर्गत देशाच्या सागरी सुरक्षेबाबत मच्छिमारांनी घ्यावयाची काळजी व समुद्रात संशयास्पद हालचाली आढळून आल्यास अलर्ट राहून सुरक्षा यंत्रणाना द्यावयाची माहिती याबाबत कोस्टगार्ड व नौदलाच्या अधिकाèयांनी यावेळी मार्गदर्शन केले.
नौकांवर व्हीटीएम्एस्, व्हीटीएस्, जीपीएस् आदी यंत्रणा बसविण्यात यावी.आवश्यक ती कागदपत्रे ठेवण्यात यावी, खराब हवामान असल्यास काळजी घ्यावी याबाबत पोलिस आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी स्थानिक मच्छिमार संजय बांदेकर, दत्ताराम कोयंडे, जगन्नाथ कोयंडे आदींनी समुद्रातील परप्रांतीय नौकांद्वारे व एलईडी मच्छिमारीद्वारे होत असलेला अनधिकृत मच्छिमारीचा विषय उपस्थित केला.एलईडी मच्छिमारीबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही याकडे कोस्टगार्ड, नेव्ही अधिकाèयांचे त्यांनी लक्ष वेधले.
पाच ते सहा वावांमध्ये अनधिकृतपणे करीत असलेल्या पर्सनेट मच्छिमारीमुळे पारंपारिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.पारंपारिक रापण मच्छिमारी संघाचे प्रतिनिधी जाधव यांनी किनारपट्टी भागात पाच ते सहा वावांमध्ये पर्सनेटधारक नौका अनधिकृतपणे मच्छिमारी करीत असून त्यांचा धुडगुसामुळे रापण मच्छिमारीवर मोठा परिणाम झाला आहे.अशाप्रकारे मच्छिमारी करणाèया पर्सनेटधारकांवर कारवाई करावी अशी मागणी करूनही यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप यावेळी रापण संघाच्या प्रतिनिधींनी केला.
यावेळी मच्छिमारी नियमांचे उल्लंघन करणाèयांवर कारवाई करण्याचे अधिकार नौदल, तटरक्षक दलाला नसल्याचे या विभागाच्या अधिकाèयांकडून सांगण्यात आले.उपस्थित मच्छिमारांनी समुद्रात मच्छिमारी करताना अनधिकृतपणे होत असलेल्या मच्छिमारीच्या तक्रारींचा पाढा वाचला.यावेळी मच्छिमारी संस्थाचे प्रतिनिधी, सरपंच, मच्छिमार, सागर सुरक्षा रक्षक आदी उपस्थित होते.
