नगर वाचनालय वेंगुर्ले: २० ऑगस्ट पर्यंत पाठविता येणार प्रस्ताव
वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरवाचनालयातर्फे तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी जे.एम.गाडेकर व अनिल सौदागर यांनी दिलेल्या देणगीतून आदर्श शिक्षक / शिक्षिका व गं.भा.गंगाबाई पांडुरंग जोशी स्मरणार्थ आदर्श शाळा पुरस्कार सन २०२१-२२ देण्यात येणार आहेत. यासाठी संपूर्ण माहिती भरलेले अर्ज २० ऑगस्टपर्यंत ग्रंथपाल, नगरवाचनालय, वेंगुर्ला यांच्याकडे ग्रंथालयाच्या कामकाजाच्या वेळेत आणून द्यावेत.
आदर्श शिक्षक, शिक्षिका आणि आदर्श शाळेच्या अर्जाचा नमुना वाचनालयात उपलब्ध आहे. त्यासाठी आवश्यक तर स्वतंत्र कागदावर रितसर माहिती भरुन शाळेच्या मुख्याध्यापकांच्या शिफारशीसह इच्छुकांनी अर्ज पाठवावेत असे आवाहन नगरवाचनायलाच्या कार्यवाह यांनी केले आहे.
