Headlines

Global Maharashtra Breaking News

आंबोलीत दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा उत्साहात संपन्न…

आंबोली ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आयोजन; दिव्यांगांच्या समस्या जाणून घेऊन निवारणाचे आश्वासन.. ⚡आंबोली ता.३०-: सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल व महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आंबोली ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आंबोली विभागातील दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सोमवार, दि. २५ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता उत्साहात संपन्न झाला.या…

Read Full News

वेंगुर्ला आडेली येथील शेतकरी अजय गडेकर यांचा वीजपुरवठा खंडित…

पुन्हा एकदा स्मार्ट मीटर वादाच्या भोवऱ्यात ; सोलार चा नवा फंडा जनतेच्या माथी…? ⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली खुटवळवाडी येथील रहिवासी शेतकरी अजय अशोक गडेकर यांच्या राहत्या घरातील विजपुरवठा विजवितरण मार्फत शुक्रवारी 29 मे रोजी खंडित करण्यात करण्यात आला आहे.कोणताही एसएमएस अथवा दूरध्वनी संबंधित शेतकऱ्यांना न देता हा प्रकार घडल्याने गोरगरीब शेतकरी अडचणीत सापडला आहे.त्यामुळे…

Read Full News

रोहन शारबिद्रे यांचा कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार…

कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशकपदी झाली निवड.. ⚡कुडाळ ता.२९-: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशकपदी कुडाळ येथील रोहन सदानंद शारबिद्रे यांची नियुक्ती झाल्याबद्दल कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक (राजपत्रित अधिकारी गट- अ) या पदावर रोहन शारबिद्रे याची निवड झाली. या पदासाठी परीक्षा झाली होती….

Read Full News

‘संडे ऑन सायकल’ मोहिमेत सहभागी व्हा…

रवींद्र खेबुडकर: ७जून रोजी जिल्हाभर सायकल रॅलीचे आयोजन… ⚡ओरोस ता २९-: तंदुरुस्त, निरोगी व सक्रिय भारत घडविण्याच्या उद्देशाने, तसेच ‘जागतिक सायकल दिना’चे औचित्य साधून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने रविवार ७ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात ‘संडे ऑन सायकल’ ही विशेष मोहीम ग्रामपंचायत व तालुकास्तरावर राबविण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे….

Read Full News

मालवण नगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांचे ४२ दिवसांचे वेतन थकीत…

नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनी वेधले नगराध्यक्षांचे लक्ष.. ⚡मालवण ता.२९-:मालवण नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या १७ सफाई कामगारांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ या महिन्यांतील तब्बल ४२ दिवसांचे वेतन माजी ठेकेदाराने अद्याप दिलेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी नागराध्यक्षांना निवेदन सादर केले. या गंभीर प्रकरणी नगराध्यक्ष ममता…

Read Full News

विलवडेतील कथित बेकायदा काळ्या दगड उत्खननावर तहसीलदारांचे कारवाईचे आदेश…

⚡बांदा ता.२९-: विलवडे येथे सुरू असलेल्या कथित बेकायदा काळ्या दगड (क्वारी) उत्खनन व वाहतूक प्रकरणी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी बांदा महसूल मंडळ अधिकारी यांना तात्काळ कारवाईचे लेखी आदेश दिले आहेत. यासंदर्भात तहसीलदार सावंतवाडी यांनी मंडळ अधिकारी बांदा यांना पत्र पाठवून उत्खनन त्वरित बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.आदेशात म्हटले आहे की, विलवडे येथे मोठ्या प्रमाणात…

Read Full News

खवले मांजराची खवले व सांबराची शिंगे जप्त…

चौघे ताब्यात :९२ लाखाचा मुद्देमाल जप्त.. ⚡ओरोस ता २९-: स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दुर्मिळ खवले मांजराची खवले आणि वन्यप्राणी सांबराची दोन शिंगे रानबांबुळी अणावकरवाडी येथे जप्त केली आहेत. तब्बल ९२ लाख किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कुडाळ आणि मालवण तालुक्यातील चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी सकाळी ११.३०…

Read Full News

गोमयधारित अँटी रेडिशन चीपचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते अनावरण…

⚡मालवण ता.२९-:गोसेवा गतिविधी सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या गोमयधारित अँटी रेडिशन चीपचे अनावरण बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय संस्कृतीत गाईला विशेष महत्त्व असून गोसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची आज समाजाला आवश्यकता आहे. गोमयापासून तयार करण्यात आलेली अँटी रेडिशन चीप हा त्याच दिशेने एक प्रेरणादायी…

Read Full News

एनएबी सिंधुदुर्गच्या सेवाकार्याला नवी गती ; नेत्र तपासणी वाहनाचे लोकार्पण…

⚡सावंतवाडी, ता.२९-: नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड एनएबी सिंधुदुर्ग, भटवाडी-सावंतवाडी यांच्या वतीने नेत्र रुग्णालयासाठी नेत्र तपासणी वाहन प्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या वाहनाचे उद्घाटन सौ. सीमा अनंत उचगावकर (मिशाळ) यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले, तर कोल्हापूर येथील उद्योगपती श्री. मोतीराम मिशाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी अंध लाभार्थी अनिल शिंगाडे,…

Read Full News

वारंवार वीज खंडितीवरून महावितरण कार्यालयात सत्ताधाऱ्यांचा मोर्चा…

इतके दिवस झोपला होता का..?”; बबन साळगावकरांचा सवाल; पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत न ठेवल्यास तीव्र आंदोलन छेडणार.. ⚡सावंतवाडी ता.२९-: पावसाळा तोंडावर आलेला असतानाही महावितरणकडून शहरात सुरू असलेल्या विजेच्या संथ कामांमुळे सावंतवाडीकर हैराण झाले आहेत. दिवसातून तब्बल १० ते १२ वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे. या पार्श्वभूमीवर आज सत्ताधारी नगरसेवकांनी माजी नगराध्यक्ष…

Read Full News

You cannot copy content of this page