पुन्हा एकदा स्मार्ट मीटर वादाच्या भोवऱ्यात ; सोलार चा नवा फंडा जनतेच्या माथी…?
⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली खुटवळवाडी येथील रहिवासी शेतकरी अजय अशोक गडेकर यांच्या राहत्या घरातील विजपुरवठा विजवितरण मार्फत शुक्रवारी 29 मे रोजी खंडित करण्यात करण्यात आला आहे.
कोणताही एसएमएस अथवा दूरध्वनी संबंधित शेतकऱ्यांना न देता हा प्रकार घडल्याने गोरगरीब शेतकरी अडचणीत सापडला आहे.
त्यामुळे स्मार्ट मीटर बाबत गोरगरीब शेतकऱ्यांची शासनामार्फत पुन्हा एकदा फसवणूक??करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.संबंधित ग्राहकांची वीज बिल भरणा अंतिम मुदत 10 जून 2026 अशी असताना 12 दिवस अगोदर विजपुरवठा खंडित करण्यात आल्याने वीजवितरणच्या कारभाराबाबत जनतेतून संताप व्यक्त होऊ लागला आहे. मागील वर्षी अजय गडेकर यांनी आकस्मिक जळलेल्या वीजमीटर बाबत अर्ज दिल्यानंतर सुमारे 8 महिने कालावधीनंतर स्मार्ट मीटर बसविण्यात आला. गोरगरीब शेतकरी प्रामाणिकपणे वीजबिल भरणा करीत असताना ” स्मार्ट मीटर ” जनतेच्या माथी मारून केवळ 1 महिन्याचे बिल पेंडिंग असताना अचानक विजपुरवठा खंडित करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित शेतकऱ्याला गेली सुमारे 15 वर्षे पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. या उन्हाळा हंगामात ” गायीना ” गढूळ पाणी पिण्यास द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत शासन गोरगरीब जनतेची चेष्टा करीत आहे. त्यामुळे वीजवितरण च्या कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहेत. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता वीजवितरणचे अधिकारी “चंद्रशेखर पेटकर” यांनी एक तासानंतर फोन रिसिव्ह केला असून नव्या सिस्टीम नुसार ही कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले. पुन्हा एकदा मोठ्या कंपन्याना अभय देऊन गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्याय करणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी अशा बेजबाबदार अधिकाऱ्याची बदलीची केलेली मागणी निश्चितच नागरिकांतून स्वागताऱह व योग्यच असल्याचे मानले जात आहे. कोणताही एसएमएस अथवा दूरध्वनी संबंधित शेतकऱ्यांना न देता आकस्मिक “विजपुरवठा सिस्टीम” चे कारण सांगून खंडित करण्यात आल्याने गोरगरीब शेतकऱ्याची ” अवहेलना ” सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.
