Global Maharashtra Breaking News

माजी सैनिक कै. बाबु राऊळ यांच्या कुटुंबाची भेट घेत माजी सैनिकानी केले सांत्वन…

सावंतवाडी ता.०१-:वेर्ले गावचे माजी सैनिक बाबु तिमा राऊळ यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. यावेळी गावातील माजी सैनिक बांधवांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले आहे. यावेळी कै. बाबु राऊळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Read More

मैदानात उतरलेले दुसरे राऊतही शिवसेनेचे करणार नुकसान

आ.दीपक केसरकर; माझ्यावरील टीकेला मतदार संघात येऊनच उत्तर देणार .. ⚡सावंतवाडी ता.०१-: शिवसेनेच्या आजच्या सावंतवाडीतील निष्ठा यात्रेत शिवसेना नेत्यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांचे उत्तर मी सावंतवाडीत येऊन देणार असून, माझ्या शिवसेना प्रवेशावेळी लाखो लोकांची उपस्थिती होती. परंतु, आज युवासेनेचे मोठे नेते आले असताना फक्त पाचशे – हजार शिवसैनिक जमा होतात. यावरून माझी माझ्या मतदार संघातील ताकद…

Read More

हर घर तिरंगा उपक्रमासाठी मालवण नगरपालिकेचे नियोजन व कार्यक्रमांचे आयोजन

⚡मालवण ता.०१-: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभरात दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार असून यासाठी मालवण नगरपालिकेने शहरात ७ हजार कापडी तिरंगा ध्वज वाटप करण्याचे नियोजन केले आहे. हे ध्वज वाटप मोफत असून यासाठी सामाजिक संस्था, बचत गट, राजकीय पक्ष, बँका यांचे सहकार्य लाभणार आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त…

Read More

आणीबाणीच्या काळात महसूल कर्मचारी नेहमीच आघाडीवर

जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी;महसूल दिनानिमित्त 40 कर्मचाऱ्यांचा गौरव ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: पूरस्थिती असो, वादळ असो की कोव्हिडचा काळ असो अशा आणीबाणीच्या प्रसंगी महसूल कर्मचारीच नेहमी आघाडीवर असतात याचा मला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी काढले. नविन जिल्हा नियोजन समिती सभागृहात महसूल दिनानिमित्त आयोजित गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी 40 महसूल अधिकारी आणि…

Read More

आपल्यासह, नारायण राणे, संदेश पारकर यांनाही केसरकर यांनी फसविले

दुसऱ्याची राजकीय कारकीर्द त्यांनी संपविली;माजी तालुकाप्रमुख उमेश कोरगांवकर यांचा आरोप सावंतवाडी : दीपक केसरकर नगरसेवक असताना नगराध्यक्ष होण्यासाठी मदत केली होती परंतु ती मदत ते विसरले. शिवसेना म्हणजे गुंडांचा पक्ष अशी टीका त्यांनी केली होती तर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सहकार्य केले नाहीत आणि आज हिंदुतत्वाबद्दल आणि शिवसेनेबद्दल बोलत आहेत, अशी टीका माजी…

Read More

शिवराज मराठा विद्यालयाच्या स्पर्धांचा निकाल जाहीर

यांनी मारली बाजी सावंतवाडी : शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आयोजित स्पर्धांच्या निकाल जाहीर.वक्तृत्व स्पर्धा लहान गट इ.५ वी ते इ.८वीप्रथम क्रमांक :-कु.दुर्वा निलेश धुरीद्वितीय क्रमांक:-कु.सृष्टी नारायण सावंततृतीय क्रमांक:-कु.आर्या अशोक कोरगावकरमोठा गट इ.९ वी इ. १० वीप्रथम क्रमांक:-कु.वैष्णवी एकनाथ गवसद्वितीय क्रमांक:-कु.सानिका सुदाम डिचोलकरतृतीय…

Read More

जनतेची सेवा करण्याची सर्वाधिक संधी “महसूल”मध्ये

तहसीलदार अजय पाटणे यांचे प्रतिपादन मालवण, दि प्रतिनिधीशासकीय सेवा बजावत असताना जनतेची सेवा करण्याची मोठी संधी असलेला विभाग म्हणजे महसूल. जनतेच्या मोठ्या अपेक्षा या विभागाकडून असतात. त्या पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी या विभागात काम करणाऱ्या आपल्या सर्वांची आहे. यापुढेही प्रत्येकाने आपली जबाबदारी पूर्ण करून आपल्या कर्तव्यात अग्रेसर राहत मालवण तालुकाही अग्रेसर ठेवावा. असे प्रतिपादन तहसीलदार…

Read More

कोरे प्रशासनाकडून मडुरा दशक्रोशीतील नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार

भाजपचे यशवंत माधव : स्वातंत्रदिनी उपोषण करण्यावर ठाम ⚡बांदा ता.०१-: मडुरा रेल्वे स्टेशनवर सध्याच्या घडीला सर्व गणपती स्पेशल गाड्यांना थांबा मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. कोकण रेल्वेने केवळ पनवेल – मडगाव गाडीला मडूरेत थांबा दिला आहे. कोरे प्रशासन मडूरे दशक्रोशीतील नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करीत प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच हा एकूण प्रकार असे सांगत…

Read More

शशिकला पारकर यांचे निधन

⚡मालवण ता.०१-: मालवण भरड येथील रहिवासी सौ. शशिकला चंद्रकांत पारकर (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे. शासकीय ठेकेदार तथा भवानी रेल्वे बुकिंग सेंटरचे संचालक संतोष पारकर यांच्या त्या मातोश्री होत.

Read More

मतदान कार्डला आधार कार्ड जोडण्याचे आवाहन

⚡सावंतवाडी ता.०१-: भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांचेद्वारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम, २०२१ अंतर्गत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा केल्या आहेत. यामधील कलम २३ नुसार मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून आधारची माहिती संग्रहित करणेबाबतच्या सुधारणा अंतर्भूत आहेत. त्याआधारे मतदार नोंदणी नियम १९६० मधील नियम २६४ मध्ये सुधारणा करण्यात…

Read More
You cannot copy content of this page