अवैध धंदे बंद करून सावंतवाडीची अस्मिता जपा

सर्वच पक्षांनी एकत्र येण्याची गरज
माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे आवाहन

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडीची अस्मिता जपण्यासाठी सावंतवाडीतील अवैद्य धंदे बंद झाले पाहिजेत. अन्यथा सावंतवाडीच्या अस्मितेला एक प्रकारे कलंक लागू शकतो. त्यामुळे शहरातील अवैद्य धंदे बंद करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे आवाहन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, सद्य स्थितीत अवैद्य धंदे वाल्यांनी दहशत निर्माण केली असून, शहरात दादागिरी करण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे. यावेळी डीवायएसपी डॉ. रोहिणी सोळंके यांनी यात तात्काळ लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी आपण स्वतः पोलिसानं विरोधात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करणार असून, पोलिसांच्या भूमिकेत काही बदल न झाल्यास शहरातील 10 हजार शहरवासीयांचे पत्र पालकमंत्र्यांना देणार असून, येत्या 8 दिवसात या अवैध धंद्यांचा गॉडफादर जाहीर करणार असल्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे.

यावेळी अजय गोंदावळे, मनोज नाईक,आनंद नेवगी,अमित परब अजय सावंत, दीनानाथ नाईक केतन आजगावकर ,सत्यवान बांदेकर,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page