बांदा/प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेली बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळेला सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश पाणदरे यांनी १२ हजार रुपये किमतीचे खेळाचे साहित्य सुपूर्द केले. यापूर्वी त्यांनी २५ हजार रुपये देणगी देत सावित्रीबाई दत्तक योजनेतून ८ मुलींना दत्तक घेतले. त्यांच्या या दातृत्वाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीने आभार व्यक्त केले.
प्राथमिक शाळेला खेळाच्या साहित्याची गरज होती. ही गरज ओळखून श्री पाणदरे यांनी शाळेसाठी १२ हजार रुपये किमतीचे विविध प्रकारचे खेळाचे साहित्य दिले. यामध्ये मैदानी तसेच बैठे खेळ खेळण्यासाठीचे साहित्य उपलब्ध आहे.
श्री पाणदरेयांच्या दातृत्वाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी आभार व्यक्त केले आहेत. शाळेचे विद्यार्थी हे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर आहेत. आभार शिक्षक जे डी पाटील यांनी मानले.
बांदा केंद्रशाळेला निवृत्त प्रा प्रकाश पाणदरे यांच्याकडून १२ हजार रुपयांचे क्रीडा साहित्य
