शिवतेज मित्र मंडळाचे आयोजन;
सलग सातव्या वर्षी आयोजन
⚡सावंतवाडी ता.१०-: शिवतेज मित्र मंडळ सावंतवाडी सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणारे मंडळ गेले सहा वर्ष नरकासू स्पर्धेचे आयोजन करत आहे. यंदा या स्पर्धेचे सातवे वर्ष असून रविवारी दि. 23 ऑक्टोबर रोजी मोती तलावाच्या काठावर श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी ग्रंथालयाच्या समोरील जागेत रात्री ठीक ९ वाजता भव्य खुले गटांमध्ये नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कमेची पारितोषिके व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी स्पर्धेचे नियम व अटी जाणून घेण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष विशाल सावंत यांना 9156969397 संपर्क करण्याचे आवाहन देखील केले आहे.
