वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
⚡गुरूग्राम दि.१०-: समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांचं दिर्घ आजारानं निधन झाले आहे. गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु वयाच्या ८२ व्या वर्षी मुलायम सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. ३ वर्षापासून मुलायम सिंह यादव यांची तब्येत खराब होती. महिन्यातून २-३ वेळा ते हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल व्हायचे. परंतु ऑगस्ट महिन्यापासून मुलायम यांची तब्येत खालावत चालली होती.
२२ ऑगस्टपासून ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. २ ऑक्टोबरला दुपारी त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, आयसीयूमध्ये हलवण्यात आले. त्यांची ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाब कमी झाला होता. मुलायम सिंह यादव यांना श्वसनाचा-रक्तदाबाचा त्रास होता. डॉ. नरेश त्रेहान आणि डॉ. सुशीला कटारिया त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. मुलायम सिंह यादव यांना युरिन इन्फेक्शनची समस्या आहे.
