Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी भाजप जनसंपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी…

⚡सावंतवाडी ता.३१-: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा युवानेते विशालजी परब, विकास परब, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, सावंतवाडी शहर चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, श्रीकांत राजाध्यक्ष, साईप्रसाद…

Read Full News

मुख्यमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप टाळावेत…

चुकीला कोणालाही पाठीशी घालणार नाही: पालकमंत्री नितेश राणे.. ⚡कणकवली ता.३१-: माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप अयोग्य असून अशा वक्तव्यांमुळे सरकारच्या कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका पालकमंत्री नितेश राणे यांनी केली. राणे म्हणाले, मुख्यमंत्री…

Read Full News

मोती तलावाचा कचरा प्रश्न सुटला; ॲड. सायली दुभाषी यांच्या मागणीला यश…

⚡सावंतवाडी ता.३०-:सावंतवाडी शहराचे मुख्य आकर्षण असलेल्या मोती तलाव परिसरातील अस्वच्छतेचा आणि कचरा तुंबण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शिवसेनेच्या नगरसेविका ॲड. सायली दुभाषी यांनी जानेवारी मध्ये झालेल्या पहिल्याच पालिकेच्या मासिक सभेत हा मुद्दा उचलून धरत तो आक्रमकपणे मांडला होता. त्यानंतर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, शहरात ठिकठिकाणी अत्याधुनिक आणि आकर्षक कचरा कुंड्या बसवण्यास प्रशासनाने…

Read Full News

“स्वच्छ व सुंदर सावंतवाडीकडे न.प.चे पाऊल…

शहरात आधुनिक कचरा पेट्यांची उभारणी”.. ⚡सावंतवाडी ता.३०-: शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आधुनिक कचरा पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या संकल्पनेतून शहरात ठिकठिकाणी या पेट्या ठेवण्यात आल्यात. स्वच्छ व सुंदर सावंतवाडीसाठी ही संकल्पना राबविण्यात आली. शहरातील कचरा कुंड्या काढल्यानंतर बऱ्याच ठिकाणी उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार होते. या पार्श्वभूमीवर स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून सावंतवाडी…

Read Full News

कुडाळात हॉटेल लेमनग्रास समोर अल्टो आणि टँकर मध्ये अपघात…

दोघे जण जखमी ; कारचे नुकसान. कुडाळ : कुडाळ – सांगिर्डेवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास टँकर आणि अल्टो कार यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात अल्टो कारमधील दोघेजण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.कणकवलीहून कुडाळच्या दिशेने जाणारा टँकर मिडलकटमधून वळत असताना कुडाळहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या…

Read Full News

मनविसेचा उद्या कणकवलीत जिल्हास्तरीय पदाधिकारी मेळावा…

⚡सावंतवाडी ता.३०-: ​महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने उद्या दुपारी ठीक ३.०० वाजता कणकवली येथील साई पॅलेस हॉलमध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा भव्य जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.​या मेळाव्याला मनविसेचे सर्व उपजिल्हाध्यक्ष, तालुका संपर्क अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, उपतालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष, विभागाध्यक्ष यांसह सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण…

Read Full News

आंगणेवाडी येथील निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धेत जय गणेश महिला कबड्डी संघ मालवण विजेता…

⚡मालवण ता.३०-:आंगणेवाडी विकास मंडळ आंगणेवाडी आणि आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धेमध्ये जय गणेश महिला कबड्डी संघ मालवण यांनी विजेतेपद तर उपविजेतेपद आंगणेवाडी महिला कबड्डी संघाने पटकावले. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक एस ए फाउंडेशन महिला कबड्डी संघमालवण तर चतुर्थ क्रमांक यंग स्टार महिला कबड्डी संघ कणकवली यांची निवड करण्यात आली….

Read Full News

कुडाळच शासकीय मैदान बनलेय दारूचा अड्डा…

मैदानावर दारूच्या बाटल्यांचा खच:कारवाई न झाल्यास ठाकरे सेना पोलीस ठाण्यासमोर करणार ठिय्या आंदोलन.. कुडाळ : सिंधुदुर्ग क्रीडा विभागाच्या ताब्यात असलेल्या कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या बाजूच्या शासकीय मैदानावर वेगळेच ‘क्रीडा प्रकार’ सध्या सुरु आहेत. हे शासकीय मैदान सध्या दारूड्यांचा अड्डा बनलं असल्याचं चित्र या मैदानाकडे पाहिल्यावर दिसत. वारंवार याबाबत कुडाळ पोलिसांना आणि संबंधित यंत्रणांना सांगून सुद्धा प्रशासन…

Read Full News

कमिशन कपातीमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न…

पिग्मी एजंटांचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांना निवेदन. ⚡कणकवली ता.३०-: राज्यातील सहकारी पतसंस्थांमध्ये पिग्मी संकलन करणाऱ्या पिग्मी एजंटांना २.५० टक्के कमिशन देण्याचा अध्यादेश सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडून लागू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पिग्मी एजंटांमध्ये नाराजी पसरली असून, कमिशन पूर्ववत करण्यासाठी पाठपुरावा करावा या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिग्मी एजंटांनी कणकवली येथे पालकमंत्री…

Read Full News

तारामुंबरी खाडीत पोहताना देवगडातील नागरिकाचा बुडून मृत्यू…

आठ दिवसांत दुसरी दुर्घटना; खाडी परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.. ⚡देवगड ता.३०-: देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील खाडीच्या मुखाशी एका नागरिकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. संबंधित व्यक्ती पोहण्यासाठी खाडीत उतरली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत व्यक्तीचे नाव अनिल गणपत मुणगेकर (वय ५५,…

Read Full News

You cannot copy content of this page