बांदा श्री विठ्ठल मंदिराचा उद्या जत्रोत्सव
काकड आरतीने पहाटे पाच वाजता होणार प्रारंभ बांदा दि.3 (प्रतिनिधी) – बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरचा प्रतिवार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दि.4 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात पहाटे पाच वाजता श्रींच्या काकडआऱतीने सोहळ्यास प्रारंभ होईल.त्यानंतर दर्शन व तीर्थप्रसादास आरंभ होईल. सायंकाळी 4 वाजता उत्सवमुर्तीचे आगमन होईल.सायंकाळी…
